IND vs AUS: भावनिक क्षण! दीड वर्षाचे प्रतीक्षा संपली अन् भरतने आईला मिठी मारली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND VS AUS 1st test ks bharat test debut

IND vs AUS: भावनिक क्षण! दीड वर्षाचे प्रतीक्षा संपली अन् भरतने आईला मिठी मारली

IND VS AUS Test kS Bharat Debut : बॉर्डर गावसकर ट्रॉफी 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघात सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांनी या सामन्यातून पदार्पण केले आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या जागी भरतला संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत संघात होता त्यामुळे त्याला संधी मिळाली नाही. जवळपास दीड वर्ष केएस भरत भारतीय संघाबरोबर प्रवास करत होता. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा भाग आहे. पंत आणि श्रेयस दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहेत.

केएस भरतचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये डेब्यू कॅप मिळाल्यानंतर भरत भावूक दिसत आहे आणि यांनी आईला मिठी मारली. त्याचबरोबर चाहते सतत या फोटोवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

यापूर्वी केएस भरत देशांतर्गत सामन्यांव्यतिरिक्त आयपीएलमध्ये खेळला आहे, परंतु आता त्याला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. केएस भरत व्यतिरिक्त सूर्यकुमार यादव कसोटी पदार्पण करत आहे. सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी टी-20 फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. आता तो भारतीय कसोटी संघाचा एक भाग आहे.

केएस भरतने 86 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने 4707 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 59.8 आहे. याशिवाय या यष्टीरक्षक फलंदाजाने लिस्ट-ए सामने आणि देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. या यष्टीरक्षक फलंदाजाने 64 लिस्ट ए सामन्यांमध्ये 33.6 च्या सरासरीने 1950 धावा केल्या आहेत. तर 67 टी-20 सामन्यांमध्ये 1116 धावांची नोंद आहे.