
IND vs AUS: रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! सूर्यकुमार यादव बाहेर?
India vs Australia 2nd ODI : भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या देशांतर्गत एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जाणार आहे. विशाखापट्टणम येथील डॉ.वाय.एस.राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 1.30 पासून हा सामना सुरू होईल. टीम इंडियाने मुंबईत खेळलेला पहिला सामना 5 विकेटने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळला नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्याने कमांड घेतली. पण आता रोहित दुसऱ्या सामन्यात आला आहे. अशा स्थितीत भारतीय संघात नक्कीच बदल होणार आहे. रोहितच्या एंट्रीने हे दोन खेळाडू धोक्यात आले आहेत.
कर्णधार रोहित असल्यामुळे तो खेळणार हे नक्की आहे. त्यामुळे इशान किशन किंवा सूर्यकुमार यादव यांना बाहेर केल्या जाऊ शकतं. हे दोघेही पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरले. इशानला संधी मिळाल्यास तो मधल्या फळीत फलंदाजीला येईल.
डेव्हिड वॉर्नर आणि अॅलेक्स कॅरी हे ऑस्ट्रेलियन संघाकडून पहिल्या सामन्यात खेळले नाहीत. वॉर्नर जखमी झाला होता, तर कॅरी आजारी होता. मात्र आता दोघेही दुसऱ्या वनडेत खेळण्याची शक्यता आहे. जर वॉर्नर परतला तर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या फलंदाजीच्या क्रमात फेरबदल करावे लागतील. तर जोश इंग्लिसच्या जागी अॅलेक्स कॅरी थेट संघात प्रवेश करेल.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.