
IND vs AUS 2nd ODI : गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी ठोकलं! ऑस्ट्रेलियाचा भारतावर १० विकेट्सने विजय
India vs Australia 2nd ODI Highlights 2023 : ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. आता मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत होणार आहे.
मिचेल मार्शचा तांडव! ठोकले दमदार अर्धशतक
मिचेल मार्शने 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने धडाकेबाज फलंदाजी केली आहे. तो 29 चेंडूत 54 धावांवर खेळत आहे.
मार्श अन् हेडची झंझावाती खेळी! कांगारूने पाच षटकार ठोकल्या 50 धावा
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड धडाकेबाज फलंदाजी करत आहेत. दोघांनी अवघ्या 32 चेंडूत संघाच्या 50 धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाने सहा षटकात बिनबाद 66 धावा केल्या आहेत. मार्श आणि हेड यांनी 31-31 धावा केल्या आहेत. दोघांनी 18-18 चेंडूंचा सामना केला आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 44 षटकात केवळ 52 धावा करायच्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने दोन षटकांत केल्या 14 धावा
118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. त्याने दोन षटकात बिनबाद 14 धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड 10 आणि मिचेल मार्श एक धाव घेत आहेत.
भारताला नववा धक्का, सलग दोन चेंडूंवर दोन धक्के
25 व्या षटकात 103 धावांवर भारताला आणखी दोन धक्के बसले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सीन अॅबॉटने कुलदीप यादवला हेडकरवी झेलबाद केले. त्याला 17 चेंडूत चार धावा करता आल्या.
यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. शमीला खातेही उघडता आले नाही. भारताची धावसंख्या 25 षटकांनंतर 9 बाद 103 अशी आहे.
भारताला सातवा धक्का
20व्या षटकात 91 धावांवर भारताला सातवा धक्का बसला. नॅथन एलिसने रवींद्र जडेजाला कॅरीकरवी झेलबाद केले. त्याला 39 चेंडूत 16 धावा करता आल्या.
टीम इंडिया अडचणीत! कोहलीही आऊट
भारताला 16व्या षटकात सहावा धक्का बसला आहे. विराट कोहली 35 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. टीम इंडियाचा एकही फलंदाज विशेष काही करू शकलेला नाही. नॅथन एलिसने कोहली एलबीडब्ल्यू केला.
तत्पूर्वी, स्टार्कला चार आणि सीन अॅबॉटला एक विकेट मिळाली. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. कर्णधार रोहित शर्मा 13 धावा, केएल राहुल 9 धावा आणि हार्दिक पंड्या 1 धावा काढून बाद झाला. भारताची धावसंख्या 16 षटकांत 6 बाद 73 अशी आहे.
भारताचा निम्मा संघ 50 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला
राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडियाला सावरता आले नाही की पुढच्याच षटकात शॉन अॅबॉटने भारताला आणखी एक धक्का दिला. 10व्या षटकात 49 धावांवर अॅबॉटने हार्दिक पांड्याला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले.
भारताची धावसंख्या 10 षटकांनंतर 5 बाद 51 अशी आहे.
विकेटचा 'चौकार'! स्टार्कने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी
भारताला चौथा धक्का नवव्या षटकात बसला आहे. मिचेल स्टार्कने कहर केला आहे. स्टार्कने टीम इंडियासाठी पडलेल्या चारही विकेट घेतल्या आहेत. त्याने आता गेल्या सामन्याचा हिरो असलेल्या केएल राहुलला आपला बळी बनवले आहे. राहुलला 12 चेंडूत 9 धावा करता आल्या. स्टार्कने राहुलला एलबीडब्ल्यू आऊट केले.
यापूर्वी त्याने शुभमन गिल (0), रोहित शर्मा (13), सूर्यकुमार यादव (0) यांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.
भारताची धावसंख्या नऊ षटकांनंतर 4 बाद 49 अशी आहे.
IND vs AUS 2nd ODI LIVE: स्टार्कचा कहर! पाच षटकांत भारताला तीन धक्के
भारताने पहिल्या पाच षटकांत तीन विकेट गमावल्या आहेत. शुभमन गिलला पहिल्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर डावाच्या पाचव्या षटकात त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले.
रोहितला 15 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 13 धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव एलबीडब्ल्यू आऊट झाला. याआधीच्या सामन्यात जसा आऊट झाला होता तसाच सूर्याही बाद झाला.
सूर्याला सलग दुसऱ्या वनडेत खातेही उघडता आले नाही. भारताची धावसंख्या पाच षटकांनंतर 3 बाद 32 अशी आहे.
पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारताला मोठा धक्का
पहिल्याच षटकात भारताला मोठा धक्का बसला. डावाच्या तिसऱ्या चेंडूवर शुभमन गिल बाद झाला. शुभमनला खातेही उघडता आले नाही. एका षटकानंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर आठ धावा आहे. सध्या कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकले! भारतीय संघात दोन मोठे बदल
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारूंचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांना वगळण्यात आले आहे. रोहित आणि अक्षर पटेल यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
विशाखापट्टणममध्ये पाऊस थांबला! टॉस थोड्या वेळात
विशाखापट्टणममध्ये पाऊस थांबला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना येथे दुपारी 1.30 पासून खेळवला जाईल. नाणेफेक दुपारी १:०० वाजता होईल.
Visakhapatnam Weather Report : दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द?
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाची छाया पसरली आहे. सामन्याच्या दिवशी विशाखापट्टणममध्ये जोरदार गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. खेळपट्टी पूर्णपणे झाकण्यात आली आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाने अचानक बदल केला आहे. शनिवारी दिल्लीसह अनेक राज्यांत मुसळधार पाऊस झाला. रविवारी पहाटे 5 वाजल्यापासून विशाखापट्टणममध्ये रिमझिम पाऊस पडत होता.