IND vs AUS: सात फलंदाजांना गाठता आला नाही दुहेरी आकडा! 26 षटकात ऑलआऊट अन् लाजिरवाणा विक्रमही

 ind vs aus 2nd odi team-india-all-out-in-just-25-overs-australia-got-the-target-of-118-runs
ind vs aus 2nd odi team-india-all-out-in-just-25-overs-australia-got-the-target-of-118-runs

Ind vs Aus 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. दुसऱ्या वनडेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरला आहे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा डाव केवळ 117 धावांत गुंडाळला आहे. या सामन्यात मिचेल स्टार्कने भारतीय संघाकडून 5 विकेट घेतल्या.

 ind vs aus 2nd odi team-india-all-out-in-just-25-overs-australia-got-the-target-of-118-runs
IND vs AUS : कर्णधार रोहित शर्मा येतात टीम इंडियातून दोन दिग्गज खेळाडूंची हकालपट्टी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. 1981 मध्ये भारतीय संघ सिडनीमध्ये 63 धावा तर 2000 साली सिडनीतच 100 धावा करू शकला होता. 7 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. 8व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने सर्वाधिक 29 धावा केल्या. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. दुसरीकडे, सीन अॅबॉटने 3 आणि नॅथन एलिसने 2 बळी घेतले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे गुडघे टेकले होते.

 ind vs aus 2nd odi team-india-all-out-in-just-25-overs-australia-got-the-target-of-118-runs
IND vs AUS 2nd ODI: आऊट, आऊट अन् आऊट… स्टार्कसमोर दिग्गज भारतीय खेळाडूंनी टेकले गुडघे

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची टॉप ऑर्डर या सामन्यातही अपयशी ठरली. गेल्या सामन्यात भारतीय संघाने 39 धावांत चार विकेट्स आणि नंतर 83 धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यात एकूण 49 धावांवर भारतीय संघाच्या पाच विकेट पडल्या.

स्टार्कने पहिल्याच षटकात शुभमन गिलला लबुशेनकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शुभमन मागील सामन्यात जसा आऊट झाला होता त्याच पद्धतीने तो बाद झाला.

 ind vs aus 2nd odi team-india-all-out-in-just-25-overs-australia-got-the-target-of-118-runs
IND vs AUS : 'बाबा रे दोन गोल्डन डक! तूझ्याकडून हे अपेक्षित नव्हती!', सूर्या T20 मध्ये हिट पण ODI फ्लॉप

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल 9 धावा करून आऊट झाले. अवघ्या 49 धावांत भारताच्या 5 विकेट पडल्या. यानंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण नॅथन एलिसने 31 धावांवर एलबीडब्ल्यू कोहलीला झेलबाद करून भारताच्या आशा भंगल्या. यानंतर जडेजानेही 16 धावा केल्या. कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणारा अक्षर पटेल 29 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. त्याने 2 षटकारही मारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com