IND vs AUS : रोज उठा, आंघोळ करा अन्...! राहुलच्या खेळीवर चाहते संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ind vs aus kl rahul flops

IND vs AUS : रोज उठा, आंघोळ करा अन्...! राहुलच्या खेळीवर चाहते संतापले

Ind vs Aus KL Rahul Flops : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिल्ली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपूर्णपणे रवींद्र जडेजाच्या नावावर राहिले. त्याने पहिल्या सत्रात 7 विकेट घेतल्या आणि कांगारू संघाला 113 धावांवर गुंडाळण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यानंतर भारतीय संघाने 115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उपाहारापर्यंत 1 गडी गमावून 14 धावा केल्या होत्या. राहुल पुन्हा एकदा या डावात काही विशेष कामगिरी करू शकला नाही आणि केवळ 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

या कसोटी मालिकेत राहुलही आतापर्यंत कोणतीही खास कामगिरी झालेली नाही. नागपूर कसोटी सामन्यात तो 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी दिल्ली कसोटी सामन्यात त्याच्या बॅटने पहिल्या डावात 17 तर दुसऱ्या डावात 1 धावा करून आऊट झाला. राहुलची ही कामगिरी पाहिल्यानंतर शुभमन गिलला संघात न घेतल्याने संघ व्यवस्थापनावर सातत्याने टीका होत आहे. त्याचवेळी चाहते सोशल मीडियावर राहुलला सतत ट्रोल करताना दिसत आहेत.

2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात राहुलचे कसोटी फॉर्मेटमधील शेवटचे शतक दिसले होते. त्यानंतर 12 डावांत फलंदाजी केल्यानंतर त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले. अशा परिस्थितीत त्याच्या संघातील स्थानावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

राहुलची वनडे फॉरमॅटमधील कामगिरी पाहिली तर त्यातही त्याच्या बॅटमधून 1 वर्षाहून अधिक काळ काही विशेष कामगिरी दिसून आलेली नाही. राहुलने मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेदरम्यान वनडेतील शेवटचे शतक झळकावले. तेव्हापासून त्याला 13 एकदिवसीय डावांपैकी केवळ 3 डावात अर्धशतक झळकावता आले आहे.