IND vs AUS: चुकीला माफी नाही! इंदूरच्या खेळपट्टीवरून वाद, ICC करणार कारवाई?

Ind vs Aus 3rd Test Indore Pitch
Ind vs Aus 3rd Test Indore Pitchsakal

Ind vs Aus 3rd Test Indore Pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळल्या जात आहे. या सामन्यातील खेळपट्टीबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. खेळाच्या पहिल्याच दिवशी एकूण 14 विकेट पडल्या. तीन दिवसांत पुन्हा एकदा खेळ संपण्याची भीती आहे. पहिल्याच दिवशी होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना भरपूर टर्न मिळत असल्याने खेळणे कठीण झाले होते. आता ICC कारवाई करणार आहे कारण...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड खेळपट्टीच्या खराब स्वरूपाची दखल घेतील आहे. नागपूर आणि दिल्लीच्या खेळपट्ट्यांना 'सरासरी' रेटिंग दिल्यानंतर, सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्याला 'सरासरीपेक्षा कमी' रेटिंग मिळू शकते.

Ind vs Aus 3rd Test Indore Pitch
Yashasvi Jaiswal : मुंबईच्या खेळाडूचे तुफानी द्विशतक! ठोठावले टीम इंडियाचे दार

धरमशाला येथून सामना हलवण्याची घोषणा दोन आठवडे अगोदर करण्यात आली होती. त्यामुळे क्युरेटर्सना खेळपट्टी तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला का? बीसीसीआय शेवटच्या क्षणी बदल करून चांगले काम करू शकले असते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

मालिकेतील सर्वच सामन्यांमध्ये प्रेक्षकांची संख्या आतापर्यंत चांगली होती, मात्र स्टेडियमच्या खेळपट्ट्यांच्या दर्जाचा प्रश्न सुटला नाही तर हे चाहते सामना पाहायला येणार का? भारतात तीन दिवसांत कसोटी खेळण्याची प्रथा कसोटी क्रिकेटची थट्टा करते, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.

Ind vs Aus 3rd Test Indore Pitch
IND vs AUS: ‘कसोटी क्रिकेटला...' इंदूर खेळपट्टीवर दिग्गज खेळाडूंची जोरदार टीका

वेंगसरकर म्हणाले, जर तुम्हाला चांगले क्रिकेट बघायचे असेल तर खेळपट्टीमुळे फरक पडतो. तुमच्याकडे असमान बाऊन्स असलेल्या विकेट्स असाव्यात जेणेकरून फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही संधी मिळू शकेल. पहिल्याच दिवसाशी पहिल्याच सत्रापासून चेंडू वळायला लागला, तर कसोटी क्रिकेटची खिल्ली उडवली जाते.

कसोटी क्रिकेटसाठी प्रेक्षकांना मैदानावर आमंत्रित करणे सर्वात महत्त्वाचे असते. आपण हे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाहू शकता, परंतु दुर्दैवाने भारतात असे घडत नाही. रंजक असेल तरच लोक कसोटी क्रिकेट पाहायला येतील. पहिल्या सत्रापासूनच गोलंदाजांनी फलंदाजांवर वर्चस्व गाजवलेले पाहावे असे कुणालाच वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com