
IND vs AUS 3rd Test : पहिल्या दिवशी कांगारूंकडे 47 धावांची आघाडी; जडेजाने टॉप ऑर्डर उडवली
India vs Australia 3rd Test Live Cricket Score : भारताला पहिल्या डावात 109 धावात गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात दमदार सुरूवात केली. मात्र रविंद्र जडेजाने कांगारूंची अवस्था 1 बाद 108 धावांवरून 4 हाद 146 धावा अशी केली. अखेर पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 4 बाद 156 धावांपर्यंत मजल मारून पहिल्या डावात 47 धावांची आघाडी घेतली.
जडेजाने 60 धावा करून कडवी झुंज देणाऱ्या उस्मान ख्वाजा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथला (26) बाद केले. याचबरोबर ट्रॅव्हिस हेड (9) आणि मार्नस लाबुशाने (31) यांचीही शिकार केली. जडेजाने ऑस्ट्रेलियाचे पहिले चार फलंदाज बाद करत टॉप ऑर्डर उडवली.
146-4 : जडेजाने टॉप ऑर्डर उडवली.
रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचे पहिले चार फलंदाज बाद केले. त्याने ख्वाजा पाठोपाठ कर्णधार स्मिथला देखील 26 धावांवर बाद करत भारताला मोठा दिलासा दिला.
125-3 : ख्वाजा जाळ्यात अडकलाच
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने एक बाजू लावून धरत 60 धावांची झुंजार खेळी केली होती. त्याने मार्नस सोबत 96 धावांची भागीदारी देखील रचली मात्र रविंद्र जडेजाने ख्वाजाला बाद करत भारताला मोठा दिलासा दिला.
रविंद्र जडेजाने जोडी फोडली.
मार्नस लाबुशाने आणि उस्मान ख्वाजा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी रविंद्र जडेजाने फोडली. त्याने मार्नसला 31 धावांवर बाद केले.
AUS 100/1 (30) : उस्मान ख्वाजाचे झुंजार अर्धशतक
सलामीवीर उस्मान ख्वाजाने भारतीय फिरकीचा उत्तम प्रकारे सामना करत झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्याने अश्विन आणि जडेजाची फिरकी निष्प्रभ ठरवत कांगारूंना शंभरी पार करून दिली.
71-1 (22 Ov) : चहापानापर्यंत कांगारूंनी केली सत्तरी पार
उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशानेने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 59 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला चहापानापर्यंत 71 धावांपर्यंत पोहचवले. ख्वाजा 33 तर मार्नस 16 धावा करून नाबाद होता.
उस्मान ख्वाजाची दमदार फलंदाजी
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने चांगली फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला अर्धशतकी जमल मारून दिली. त्याला मार्नस लाबुशेनने देखील चांगली साथ दिली.
12-1 : कांगारूंना पहिला धक्का
रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅविस हेडला 9 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.
108-9 : उमेशची आक्रमकता 17 धावात आली संपुष्टात
उमेश यादवने 12 चेंडूत 17 धावा करत भारताला शतकी मजल मारून दिली. मात्र मॅथ्यू कूहमनने त्याला बाद करत आपला पाचवा फलंदाज टिपला.
88-8 : भारताला आठवा धक्का; अश्विनही स्वस्तात माघारी
ऑस्ट्रेलियाच्या कूहमनने भारताची शेवटची आशा अश्विनला 3 धावांवर बाद करत भारताला आठवा धक्का दिला. उपहारापूर्वी भारताच्या 84 धावांवर 7 फलंदाज बाद झाले होते. आता उपहारानं भारताची अवस्था 8 बाद 88 धावा अशी झाली.
आपल्याच जाळ्यात अडकला टीम इंडिया! कंगारूंच्या फिरकीपटूचा कहर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसर्या कसोटीत भारताची सुरुवात चांगली झाली नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत 7 गडी गमावून 84 धावा केल्या होत्या.
मॅथ्यू कुहनमनने भारतीय सलामीवीर रोहित शर्मा रोहित शर्मा, शुभमन गिल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.यानंतर नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांना बाद केले. मॅथ्यूने श्रेयस अय्यरला बाद करून भारताला 5वा धक्का दिला. विराट कोहलीने काही काळ एक टोक राखले पण टॉड मर्फीने त्याला पॅव्हेलियनमध्ये एलबीडब्ल्यू पाठवले. कोहलीने 52 चेंडूत 22 धावा केल्या.
डावाच्या 25व्या षटकात भारताला सातवा धक्का बसला. श्रीकर भरत 30 चेंडूत 17 धावांची खेळी करून एलबीडब्ल्यू आऊट झाला. लिऑनने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. भरतने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. सध्या रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत.
डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या आहेत.
भारताला सहावा धक्का! विराट कोहली आऊट
भारताने 22 षटकात 6 गडी गमावून 71 धावा केल्या आहेत. विराट कोहली 22 धावा करून बाद झाला. त्याला टॉड मर्फीने एलबीडब्ल्यू आऊट केले.
कांगारूं गोलंदाजाचा कहर! एक तासात भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण संघाची सुरूवात खराब झाली.
सामना सुरू झाल्याच्या तासाभरात भारताने पाच विकेट गमावल्या आहेत. सामना 9:30 वाजता सुरू झाला आणि 10:30 पर्यंत रोहित शर्मा 12, शुभमन गिल 21, चेतेश्वर पुजारा 1, रवींद्र जडेजा 4 आणि श्रेयस अय्यर 0 धावा करून तंबुत परतले.
आतापर्यंतच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले आहे. मॅथ्यू कुह्नेमनने रोहित, शुभमन आणि श्रेयसला बाद केले. त्याचवेळी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजाला आऊट केले.
इंदूर कसोटीत भारताची सुरूवात खराब! पुजाराही तंबुत
डावाच्या नवव्या षटकात भारताला तिसरा धक्का बसला. नॅथन लायनने चेतेश्वर पुजाराला क्लीन बोल्ड केले. भारताची धावसंख्या नऊ षटकांनंतर 3 बाद 40 अशी आहे. सामना सकाळी साडेनऊ वाजता सुरू झाला आणि 10:15 पर्यंत म्हणजेच 45 मिनिटांतच भारताने रोहित-शुबमन आणि पुजाराच्या विकेट्स गमावल्या.
सुरुवातीचे भारताला दोन धक्के!
डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुह्नेमनने भारताला सुरुवातीचे दोन धक्के दिले. याआधी त्याने रोहितला यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीकडून स्टंप आऊट केले होते. आता त्याला केएल राहुलच्या जागी संघात संधी मिळालेल्या शुभमन गिलला स्टीव्ह स्मिथने झेलबाद केले. शुभमनला 18 चेंडूत 21 धावा करता आल्या.
भारताला पहिला धक्का! कर्णधार रोहित तंबुत
भारताला पहिला धक्का डावाच्या सहाव्या षटकात 27धावांवर बसला आहे. कर्णधार रोहितला मिळालेल्या दोन जीवांचे जास्त काही करता आले नाही. त्याला मॅथ्यू कुहनेमनने यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हाती यष्टिचित केले. रोहितला 23 चेंडूत 12 धावा करता आल्या. सध्या शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर आहेत.
पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलिया संघाचा गोंधळ! रोहितला मिळाले दोन जीवनदान
ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला जीवदान मिळाले. चेंडू रोहितच्या बॅटला लागला आणि विकेटकीपर कॅरीच्या हातात गेला पण अंपायरने आऊट दिला नाही. स्टार्क, स्मिथ आणि कॅरी बोलले पण रिव्ह्यू घेतला नाही. रोहितने रिव्ह्यू घेतला असता तर परत जावे लागले असते. चौथ्या चेंडूवरही रोहित LBW झाला पण ऑस्ट्रेलियाने पुन्हा रिव्ह्यू घेतला नाही.
थोडक्यात जाणून घ्या Playing-11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन.
भारताने जिंकले नाणेफेक घेतला हा निर्णय!
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग-11 मध्ये कर्णधाराने दोन बदल केले आहेत. केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांना वगळण्यात आले आहे. राहुलच्या जागी शुभमन गिल आणि शमीच्या जागी उमेश यादवला खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद भूषवत असलेल्या स्टीव्ह स्मिथनेही प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत.
राहुलऐवजी गिलला संधी?
केएल राहुलवरून बरीच चर्चा झालेली आहे. त्याच्याकडून उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात राहुलऐवजी शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आजच्या दिवशी गिल अधिक सराव करताना दिसून आला.