
IND vs AUS : इंदूर कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला तर....! WTC फायनलमध्ये जाणार बाहेर?
India vs Australia World Test Championship Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळल्या जात आहे. या सामन्यात भारताची सुरुवात काही खास झाली नव्हती. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला. तसे भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला 197 धावांत गुंडाळले आणि त्यांना केवळ 88 धावांची आघाडी घेतली आली.
इंदूर कसोटी सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर अंतिम फेरीत प्रवेश करेल. या सामन्यात पराभव झाल्यास भारताची अंतिम फेरी गाठण्याची प्रतीक्षा थोडी वाढू शकते. इंदूर कसोटीत पराभव झाल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला अहमदाबाद कसोटी सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल.
भारतीय संघाची या कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरी झाली तर न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेतील निकालावर अवलंबून राहावे लागेल. अशा स्थितीत श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी किमान एक तरी हरवावी अशी प्रार्थना भारताला करावी लागेल. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तेही मायदेशात जिंकणे श्रीलंकेसाठी खूप कठीण असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतसाठी ऑस्ट्रेलियाचे समीकरण स्पष्ट आहे. भारताविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी किमान एकात पराभव टाळावा लागणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया 3-0 किंवा 3-1 ने मालिका गमावला तरी अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. जर ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने गमावले, तर अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकावी लागेल, त्यात अपयशी ठरल्यास भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार आहे.