IND vs AUS: शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत! कंगारू खेळणार इंदूरचा ‘डाव’? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia Ahemdabad Test

IND vs AUS: शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत! कंगारू खेळणार इंदूरचा ‘डाव’?

India vs Australia Ahemdabad Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 मार्चला मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. इंदूर कसोटी गमावल्यानंतर टीम इंडिया सावध झाली असून आता येथे विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण टीम इंडियासाठी येथे अडचणी वाढत आहेत, कारण ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीसाठी पूर्ण तयारी केली आहे.

वृत्तानुसार मालिकेतील शेवटच्या कसोटीत स्टीव्ह स्मिथच संघाचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला आहे कारण त्याच्या आईची तब्येत बिघडली आहे. अशा परिस्थितीत त्याचे पुनरागमन अद्याप निश्चित झालेले नाही.

पॅट कमिन्स परत न आल्यास फक्त स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाची धुरा सांभाळेल. स्टीव्ह स्मिथचा कर्णधार म्हणून भारतातील रेकॉर्ड खूप चांगला आहे. इंदूरमध्येही कांगारू संघाने त्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला.

स्टीव्ह स्मिथने पाच कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले आहे, त्यापैकी 2 जिंकले आहेत आणि 2 पराभूत झाले आहेत. तर एक कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. स्टीव्ह स्मिथ अहमदाबाद कसोटीतही आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून मालिका बरोबरीत राहील. त्याचबरोबर टीम इंडियाला या सामन्यात पुनरागमन करायला आवडेल.

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन

भारतीय संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , सूर्यकुमार यादव , जयदेव उनाडकट