IND vs AUS Day 4 Live: चौथ्या दिवशी विराटची दमदार खेळी! भारताकडे 88 धावांची आघाडी अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS Day 4 Live
Live

IND vs AUS Day 4 Live: चौथ्या दिवशी विराटची दमदार खेळी! भारताकडे 88 धावांची आघाडी अन्...

IND vs AUS 4th Test Day 4 Live : अहमदाबाद कसोटी सामन्याचा चौथा दिवस भारतीय क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याचे पहिले तीन दिवस फलंदाजांच्या नावावर होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 480 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 571 धावा केल्या.

यासह टीम इंडियाने 91 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 186 धावा केल्या. त्याचवेळी शुभमन गिलने 128 धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही 79 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या डावात भारताच्या नऊ विकेट पडल्या, पण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही आणि भारताचा डाव नऊ विकेट्सवर संपला.

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3/0 आहे. भारताकडे अजूनही 88 धावांची आघाडी आहे.

03:47 AM,  Mar 12 2023

निर्णायक चौथा दिवस! किंग कोहली संपवणार का कसोटी शतकांचा दुष्काळ?

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या कसोटी शतकांचा दुष्काळ संपवू शकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विराटने 14 महिन्यांनंतर अर्धशतक झळकावले आहे. आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.

04:15 AM,  Mar 12 2023

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू

अहमदाबादमध्ये चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा ही जोडी क्रीझवर आहे. 105 षटके खेळल्यानंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 303 धावा केल्या आहेत.

04:33 AM,  Mar 12 2023

 चौथ्या दिवसाच्या अर्ध्या तासात भारताला मोठा धक्का!

चौथ्या दिवसाच्या अर्ध्या तासात भारताला मोठा धक्का बसला आहे. 309 धावांवर रवींद्र जडेजा 84 चेंडूत 28 धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. टॉड मर्फीने त्याला उस्मान ख्वाजाकडून झेलबाद केले. भारताच्या धावसंख्येने चार विकेट गमावून 310 धावा केल्या आहेत.

06:12 AM,  Mar 12 2023

चौथ्या दिवशी टीम इंडिया मजबूत स्थितीत! कोहलीची 28 व्या कसोटी शतकाकडे वाटचाल...

पहिल्या सत्राचा खेळ चौथ्या दिवशी संपला आहे. भारताचा स्कोर 362/4 आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 118 धावांनी मागे आहे. विराट कोहली 88 आणि श्रीकर भरत 25 धावांवर खेळत आहे. दुसऱ्या सत्रात कोहली आपले शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर भारतीय संघाला वेगवान धावा करून ऑस्ट्रेलियाची आघाडी संपवायची आहे.

07:07 AM,  Mar 12 2023

भरतचे अर्धशतक सहा धावांनी हुकले

भारताचा निम्मा संघ 393 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. भारताची पाचवी विकेट श्रीकर भरतच्या रूपाने पडली. भरतने पीटर हँड्सकॉम्बच्या हाती नॅथन लायनने झेलबाद केले. भरतने 88 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या.

07:15 AM,  Mar 12 2023

IND vs AUS Day 4 Live: विराट कोहलीने ठोकले शतक!

विराट कोहलीने आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने 241 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. विराटने आतापर्यंत आपल्या खेळीत पाच चौकार मारले आहेत.

08:22 AM,  Mar 12 2023

विराट अन् अक्षरने सांभाळली टीम इंडियाची धुरा

विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. यासह भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 455 धावा केल्या आहेत. शतक झळकावल्यानंतर कोहली खेळत आहे. त्याचवेळी अक्षर पटेल आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करत आहे.

08:51 AM,  Mar 12 2023

ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त 8 धावांनी मागे

विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी आतापर्यंत 79 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. टी-ब्रेकपर्यंत भारताची धावसंख्या 5 गडी बाद 472 आहे. कोहली 135 आणि अक्षर 38 धावांवर खेळत आहे. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त 8 धावांनी मागे आहे.

09:20 AM,  Mar 12 2023

अक्षरने चौकार मारत कांगारू संघावर घेतली आघाडी!

अहमदाबाद कसोटीत चौथ्या दिवशी तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. अक्षरने चौकार मारत कांगारू संघावर आघाडी घेतली आहे. विराट कोहली आपल्या 150 धावांच्या जवळ पोहोचला आहे. त्याचवेळी अक्षर पटेलही अर्धशतकाच्या जवळ आहे. भारताची धावसंख्या 500 धावांच्या जवळ पोहोचली आहे.

09:42 AM,  Mar 12 2023

IND vs AUS Day 4 Live: कोहली भाऊने ठोकल्या शानदार दीडशे! टीम इंडियाने गाठला ५०० धावांचा आकडा

विराट कोहलीने अहमदाबाद कसोटीत 150 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने अक्षर पटेलसोबत शतकी भागीदारीही केली आणि भारताची धावसंख्या पाच विकेट्सवर 500 धावांच्या पुढे नेली. अक्षर पटेलही अर्धशतकाच्या जवळ आहे.

10:05 AM,  Mar 12 2023

अक्षर पटेलचे अर्धशतक

विराट कोहलीपाठोपाठ आता अक्षर पटेलही आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. अक्षरने आपले अर्धशतक पूर्ण केले, त्याने हा पराक्रम 95 चेंडूत केला. अक्षरने आपल्या खेळीत 4 चौकार 1 षटकार लगावला आहे. त्याने विराट कोहलीसोबत आतापर्यंत 125 धावांची भागीदारी केली आहे.

10:14 AM,  Mar 12 2023

IND vs AUS Day 4 Live: लोकल बॉय अक्षर पटेलकडून षटकारांचा पाऊस!  

10:27 AM,  Mar 12 2023

भारताची पडली सहावी विकेट 

भारताची सहावी विकेट 555 धावांवर पडली आहे. अक्षर पटेल 113 चेंडूत 79 धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले.

10:58 AM,  Mar 12 2023

भारतीय संघाला मोठा धक्का! अश्विनआऊट

568 धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली आहे. रविचंद्रन अश्विन 12 चेंडूत सात धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या डावात चौकार लगावला. आता विराट कोहलीसोबत उमेश यादव क्रीझवर आहे. 176 षटकांनंतर भारताची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 568 आहे.

10:58 AM,  Mar 12 2023

टीम इंडियाला एकापाठोपाठ दोन धक्के! कोहली द्वितीय शतकच्या जवळ

569 धावांच्या स्कोअरवर भारताची आठवी विकेट पडली. उमेश यादव खाते न उघडता धावबाद झाला. त्याला एकाही चेंडूचा सामना करावा लागला नाही. विराटच्या सांगण्यावरून दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात उमेशने आपली विकेट गमावली.

11:06 AM,  Mar 12 2023

विराट कोहलीचे द्विशतक हुकले! भारताचा डाव ५७१ धावांवर संपला

भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने 91 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 186 धावा केल्या. त्याचवेळी शुभमन गिलने 128 धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही 79 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या डावात भारताच्या नऊ विकेट पडल्या, पण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही आणि भारताचा डाव नऊ विकेट्सवर संपला.

11:19 AM,  Mar 12 2023

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू झाली आहे. ट्रॅव्हिस हेड आणि कुहनमन यांनी डावाला सुरुवात केली आहे. उस्मान ख्वाजा फलंदाजीला आला नाही आणि कुहनमनला त्याच्या जागी नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आले.