IND vs AUS: कर्णधारपद मिळताच हार्दिक पांड्याला आला माज; विराटशी केले गैरवर्तन Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Ignored Virat Kohli

IND vs AUS: कर्णधारपद मिळताच हार्दिक पांड्याला आला माज; विराटशी केले गैरवर्तन Video Viral

Hardik Pandya Ignored Virat Kohli : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 5 गडी राखून विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळत नव्हता. त्याच्या जागी हार्दिक पांड्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. सामन्यादरम्यान असे काही घडले, जे पाहून विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी मुंबईत खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी 3-3 विकेट घेतल्या आणि संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 188 धावांत गारद झाला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. निम्मा संघ 83 धावांवर परतला होता. येथून केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सांभाळला आणि सामना संपवला.

विराट कोहलीचे चाहते संतापले कारण, 20व्या षटकानंतर विराट कोहली हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्यासोबत उभा राहून काहीतरी बोलत होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराटला हार्दिकला काही समजावून सांगायचे होते, पण तो त्याचे न ऐकताच निघून गेला.

विराट कोहली हे पाहून अस्वस्थ झाला आणि जणू काही तो म्हणतोय की तुला जे हवं ते मनापासून कर. हार्दिक आपल्या नादात पुढे गेला आणि त्याने विराटकडे मागे वळूनही पाहिले नाही.

संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांना नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या मालिकेतही हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना तो कर्णधारपदाचा दरारा दाखवत म्हणाला होता. बाहेरून कोण काय म्हणतो याने आपल्या पातळीवर काही फरक पडत नाही. हा माझा संघ आहे, त्यामुळे मी आणि प्रशिक्षक योग्य बाजूने खेळू.