
नागपुरात पहिल्या दिवसाचे पहिले सत्र संपले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दोन गड्यांच्या मोबदल्यात 76 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेन ही जोडी क्रीजवर आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली आहे. भारताने चांगली सुरुवात केली होती मात्र त्यांना ती कायम ठेवता आले नाही.
IND vs AUS 1st Test : पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व; भारताने पहिल्या डावाची केली दमदार सुरूवात
India vs Australia 1st Test Live Cricket Score : नागपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोन सत्रातच 177 धावात संपवला. भारताकडून पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने 47 धावात निम्मा संघ ( 5 विकेट्स) गारद केला. तर अश्विनने 3 कांगारू टिपून त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशानेने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दिवसअखेर 1 बाद 77 धावांपर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने 1 विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रोहित शर्मा 56 धावांवर तर नाईट वॉचमन आर. अश्विन शून्य धावा करून नाबाद होता. भारत पहिल्या डावात अजून 100 धावांनी मागे आहे.
रोहितचे दमदार अर्धशतक, मात्र भारताला एक धक्का
रोहित शर्माने दमदार अर्धशतक ठोकत भारताला बिनबाद 76 धावांपर्यंत पोहचवले. मात्र टॉड मर्फीने सावध फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलला 20 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.
IND 59/0 (17.5) : रोहितची आक्रमक फलंदाजी, भारताची दमदार सलामी
भारताने चहापानानंतर आपल्या पहिल्या डावाला सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. दुसऱ्या बाजूने केएल राहुल सावध फलंदाजी करत त्याला उत्तम साथ देत होता.
रवींद्र जडेजाचा पंजा
176 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची नववी विकेट पडली आहे. पीटर हँड्सकॉम्ब 84 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. रवींद्र जडेजाने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. जडेजाने या डावात पाच विकेट घेतल्या आहेत.
173-8 : जडेजाने केली चौथी शिकार
अश्विनने कर्णधार कमिन्सला 6 धावांवर बाद केल्यानंतर रविंद्र जेडजाने टॉड मर्फीला शुन्यावर बाद करत आपली चौथी शिकार केली. कांगारूंची अवस्था चहापानापर्यंत 8 बाद 174 धावा अशी केली.
AUS 162/6 (53.1) : अश्विन आला धावून
68 चेंडूत 53 धावांची आक्रमक भागीदारी रचणाऱ्या कॅरी - हॅड्सकॉम्ब जोडीला अखेर आर. अश्विननेच सुरूंग लावला. त्याने 33 चेंडूत 36 धावांची खेळी करणाऱ्या कॅरीचा काटा काढला.
AUS 153/5 (52) : कॅरी - हॅड्सकॉम्बची आक्रमक फलंदाजी
मार्नस आणि स्मिथ दोघेही बाद झाल्यानंतर कांगारूंची अवस्था 5 बाद 109 धावा अशी झाली होती. मात्र अॅलेक्स कॅरी आणि पिटर हँट्सकॉम्ब यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करत कांगारूंचे दीडशतक धावफलकावर लावले.
AUS 109/5 (42) : स्टीव्ह स्मिथचीही केली जडेजाने शिकार
दुखापतीतून सावरलेल्या रविंद्र जडेजाने झोकात पुनरागमन केले. त्याने ऑस्ट्रेलियाचे फिरकीचा चांगला सामना करत असलेल्या स्टीव्ह स्मिथला 37 धावांवर बाद केले.
मार्नसचा स्वप्नभंग, मॅट रेनशॉ आल्या पावली माघारी
भारतीय फरकीचा यशस्वी सामना करत मार्नस लाबुशानेने स्टीव्ह स्मिथ सोबत 82 धावांची भागीदार रचली होती. मात्र रविंद्र जडेजाने लंंचनंतर लगेचच मार्नसला 49 धावांवर बाद केले. त्याचे अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर जडेजाने
टीम इंडियाची सुरुवात शामदार मात्र...; कांगारू लंचपर्यंत 75/2
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 50 पार!
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 50 धावांच्या पुढे गेली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेन यांनी कांगारू संघाचा डाव सांभाळला आहे. दोघेही आता मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऑस्ट्रेलिया 10 षटकांनंतर 27/2
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 10 षटकांत 2 गडी गमावून 27 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन क्रीजवर आहेत.
2 धावा 2 विकेट! सिराज-शमी जोडीने उघडले खाते
दोन धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली आहे. मोहम्मद शमीने भारताला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने आतल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला क्लीन बोल्ड केले आणि ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर आता पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
सिराजने 2 धावांच्या स्कोअरवर कांगारू संघाला दिला पहिला धक्का!
दोन धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का बसला आहे. उस्मान ख्वाजा तीन चेंडूत एक धाव काढून बाद झाला आहे. मोहम्मद सिराजने या सामन्यात पहिल्याच चेंडूवर भारताला यश मिळवून दिले.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू, डेव्हिड वॉर्नर अन् ख्वाजा मैदानात
ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू झाला आहे. स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा डावाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत. भारताकडून गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आला आहे.
जाणून घ्या प्लेइंग-11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड.
सूर्यकुमार यादव आणि केएस भरत करणार पदार्पण
भारतीय संघात सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांनी या सामन्यातून पदार्पण केले आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या जागी भरतला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा भाग आहे. पंत आणि श्रेयस दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहेत.
ऑस्ट्रेलियाने जिंकले नाणेफेक
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात पहिल्या दिवशी खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे सोपे असते. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दिवशी मोठी धावसंख्या भरण्याचा प्रयत्न करेल.
सूर्यकुमार यादव पदार्पण करणार?
सूर्यकुमार यादव आज कसोटी पदार्पण करणार का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. सूर्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यर पहिल्या कसोटीतून बाहेर आहे. अशा स्थितीत सूर्याला आज कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. सूर्या आज कसोटी पदार्पण करणार की नाही हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.