
IND vs AUS: वनडे मालिकेसाठी रोहित नाही 'या' खेळाडूला मिळाली कर्णधारपद!
IND vs AUS Indian team for ODI Series Announced : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी दिल्ली कसोटी जिंकल्यानंतर काही तासांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाची घोषणा केली. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार नाही. ही माहिती बीसीसीआयनेच दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यासोबतच बीसीसीआयने रोहित शर्मा बदल माहिती दिली. रोहित शर्मा मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद स्वीकारणार नाही. कौटुंबिक कारणांमुळे तो संघाचा भाग होऊ शकणार नाही. यावेळी अष्टपैलू हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
इशान किशनचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजालाही स्थान देण्यात आले आहे पण अश्विन संघाचा भाग नाही. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोन्ही फिरकीपटूंना संघात संधी देण्यात आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला वनडे सामना 17 मार्चला मुंबईत होणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 22 मार्चला चेन्नईत खेळल्या जाणार आहे. याआधी मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये 1 मार्चपासून तर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळल्या जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.