Ind vs Aus : वर्ल्ड कप संघातल्या फक्त तिघांना संधी! टी-20 मालिकेसाठी महाराष्ट्राचा 'लाडका' बनला उपकर्णधार

Ind vs Aus : A chance for only three of the World Cup team! Maharashtra's 'favourite' vice-captain for the T20 series...
ind vs aus t20 series Only 3 players from the World Cup squad got a chance Ruturaj Gaikwad vice-captain
ind vs aus t20 series Only 3 players from the World Cup squad got a chance Ruturaj Gaikwad vice-captainEsakal
Updated on

IND vs AUS T20 series Ruturaj Gaikwad vice-captain :

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव यांच्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याच वेळी, महाराष्ट्राचा लाडका ऋतुराज गायकवाडला तीन सामन्यासाठी उपकर्णधार केले आहे.

तर शेवटच्या दोन सामन्यासाठी श्रेयस अय्यर उपकर्णधाराचीही भूमिका बजावणार आहे. या मालिकेत भारताला पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. ही मालिका 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.

ind vs aus t20 series Only 3 players from the World Cup squad got a chance Ruturaj Gaikwad vice-captain
Ind vs Aus T20 Series : संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर वॉर्नर गेला घरी! भारताविरुद्धच्या मालिकेतून अचानक घेतली माघार

एकदिवसीय वर्ल्ड कप संघात असलेल्या फक्त तीन खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे. बाकीच्या खेळाडूंना विश्रांती दिली आहे. कर्णधार सूर्यकुमार हा एकमेव आहे ज्याने सर्वाधिक सामने खेळले आहेत. त्याच्याशिवाय इशान किशनही संघात आहे, ज्याला पहिले दोन सामने खेळण्याची संधी मिळाली.

हार्दिक पांड्या दुखापत झाल्यानंतर वर्ल्ड कप संघात सामील झालेल्या प्रसिद्ध कृष्णालाही संधी देण्यात आली आहे. मात्र, या स्पर्धेत तो एकही सामना खेळलेला नाही. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये दोन शतकांच्या मदतीने 500 हून अधिक धावा करणारा श्रेयस अय्यर मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये उपकर्णधार म्हणूनही खेळणार आहे.

ind vs aus t20 series Only 3 players from the World Cup squad got a chance Ruturaj Gaikwad vice-captain
Ind vs Aus : हसरे दुःख! टी-20 संघातून वगळल्यानंतर चहलची पहिली प्रतिक्रिया! एका इमोजीमध्ये व्यक्त केली भावना

ऋतुराजच्या नेतृत्वाखाली भारताने हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. संघ निवडीसाठी सोमवारी (20 नोव्हेंबर) अहमदाबाद येथे झालेल्या निवड समितीच्या बैठकीत त्याला कर्णधार बनवण्याबाबत कोणताही विचार झाला नाही. पण त्याला तीन सामन्यासाठी भारतीय संघाचा उपकर्णधार करण्यात आले आहे.

तसेच आशियाई स्पर्धेत खेळलेल्या यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग आणि जितेश शर्मा या खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

तर मागील काही टी-20 मालिकेत टीम इंडियाचे कर्णधार असलेला हार्दिक पांड्या दुखापतीमुळे या संघाचा भाग नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com