IND vs AUS: IPL लिलावापूर्वीही अन् नंतरही ग्रीनचा धमाका! भारतीय गोलंदाजांनाही दाखवलं आस्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia Test Cameron Green

IND vs AUS: IPL लिलावापूर्वीही अन् नंतरही ग्रीनचा धमाका! भारतीय गोलंदाजांनाही दाखवलं आस्मान

India vs Australia Test Cameron Green : अहमदाबाद येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 422 हून अधिक धावा केल्या असून त्यांच्या 2 विकेट शिल्लक आहेत. उस्मान ख्वाजानंतर भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना कॅमेरून ग्रीनने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

कॅमेरून ग्रीनने इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावात कहर केला होता. ग्रीनला विकत घेण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने (MI) 17.50 कोटी रुपयांची बोली लावून त्याला खरेदी केले. ग्रीन पहिल्यांदाच आयपीएल खेळताना दिसणार आहे.

अष्टपैलू कॅमेरून ग्रीन अहमदाबाद कसोटीत बॅटने कहर करत आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना ग्रीनने शानदार फलंदाजी केली आणि रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चौकार मारून आपले पहिले शतक पूर्ण केले. यासाठी कॅमेरून ग्रीनने केवळ 143 चेंडू खेळले आणि त्याने 16 चौकार मारले.

ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात 170 धावांवर चौथी विकेट गमावली होती. यानंतर कॅमेरून ग्रीनने उस्मान ख्वाजासोबत 5व्या विकेटसाठी 358 चेंडूत 208 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 350 च्या पुढे नेली.