IND vs AUS: शंभरावी टेस्ट पण धावा शून्य, कमनशिबी पुजाराच्या नावे झाला हा लाजिरवाणा रेकॉर्ड

Ind vs Aus Test Cheteshwar Pujara
Ind vs Aus Test Cheteshwar Pujara

Ind vs Aus Test Cheteshwar Pujara : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेली दिल्ली कसोटी चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीसाठी खूप खास आहे. चेतेश्वर पुजारा 100व्या कसोटीत शतक करायची मनीषा बाळगून होता. चेतेश्वर पुजाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण लाइफलाइन असूनही तो खाते उघडू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. आता तो दुसऱ्या डावात कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.

Ind vs Aus Test Cheteshwar Pujara
IND vs AUS: सिराजचा 'तो' बॉल अन् वॉर्नरला कसोटीतून बाहेर! या दिग्गज खेळाडूची संघात एंट्री

नॅथन लियॉनने 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केएल राहुलला आऊट केले. यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजाराचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. मात्र दुसऱ्या चेंडूवर तो थोडक्यात बचावला. येथे ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला नाही आणि पुजाराला जीवदान मिळाले.

ऑस्ट्रेलियाने मात्र ही चूक 19व्या षटकात सुधारली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लायनने प्रथम रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले आणि नंतर चौथ्या चेंडूवर पुजारावर आऊट केलं. कर्णधार रोहित 69 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाला, तर पुजारा खातेही उघडू शकला नाही. अशाप्रकारे 100 व्या कसोटीत डक आऊट झाल्यामुळे लाजिरवाणा विक्रम केला आहे.

Ind vs Aus Test Cheteshwar Pujara
Prithvi Shaw Selfie Controversy: पृथ्वी शॉचा सेल्फी वाद विकोपाला; मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई!

१००व्या कसोटीत शून्यावर बाद झालेले फलंदाज

  • दिलीप वेंगसरकर विरुद्ध न्यूझीलंड (1988)

  • अॅलन बॉर्डर विरुद्ध WI (1988)

  • कोर्टनी वॉल्श विरुद्ध ENG (1998)

  • मार्क टेलर विरुद्ध ENG (1998)

  • स्टीफन फ्लेमिंग वि एसए (2006)

  • अॅलिस्टर कुक वि AUS (2013)

  • ब्रेंडन मॅक्क्युलम विरुद्ध AUS (2016)

  • चेतेश्वर पुजारा वि AUS (2023)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com