VIDEO: 'हमरी भाभी कैसी हो, सारा भाभी...', इंदूरमध्येही चाहत्यांनी शुबमन गिलला चिडवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test fans shouted sara-name-in-indore-test-when-shubman-gill-fielding-on-boundary-watch cricket news kgm00

VIDEO: 'हमरी भाभी कैसी हो, सारा भाभी...', इंदूरमध्येही चाहत्यांनी शुबमन गिलला चिडवले

IND vs AUS 3rd Test : भारतीय संघ इंदूर कसोटीत हरण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करेल. सध्या दोन दिवसांचा खेळ संपला आहे आणि असे म्हणता येईल की या कसोटी सामन्याचा निकाल दोनच दिवसांवर आला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 76 धावांची गरज आहे. भारताला क्रमवारीत 10 विकेट्स घ्याव्या लागतील.

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली. संपूर्ण संघ केवळ 163 धावांवरच ऑलआऊट झाला. या सामन्यात केएल राहुलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणारा युवा सलामीवीर शुभमन गिलही दोन्ही डावात फ्लॉप ठरला. पहिल्या डावात 21 धावा करणाऱ्या शुभमनने दुसऱ्या डावातही केवळ 5 धावा केल्या. मात्र खराब फलंदाजीव्यतिरिक्त शुभमन आणखी एका कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहिला.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जेव्हा शुभमन सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्यांनी साराचे नाव घेऊन त्याला चिडवायला सुरुवात केली. मात्र यादरम्यान शुभमननेही हरकत न घेता चाहत्यांना हस्तांदोलन करून अभिवादन केले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चाहते 'हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो' असे ओरडताना ऐकू येत आहेत.

चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून तो शेअरही करत आहेत. या स्टार क्रिकेटरसोबत साराचे नाव बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. मात्र, ही सारा तेंडुलकर किंवा सारा अली खान कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत अफवांच्या बाजारात अशा बातम्या येत आहेत आणि चाहते साराचे नाव घेऊन शुबमनला चिडवत राहतात.