IND vs AUS: "जखमी असलो तर एका पाया वरही खेळेन" टीमसाठी जिद्दी हनुमा पुन्हा तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test hanuma vihari-courage-and-dedication-in-ranji-trophy-quarter-final-ready-to-bat-with-one-leg cricket news

IND vs AUS: "जखमी असलो तर एका पाया वरही खेळेन" टीमसाठी जिद्दी हनुमा पुन्हा तयार

Ind vs Aus Test Hanuma Vihari : आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळल्या गेलेल्या रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हनुमा विहारीने संघासाठी काहीही करण्याची जिद्द दाखवली. उजव्या हाताचा फलंदाज हनुमा विहारी जो फ्रॅक्चर झालेल्या हाताने डावखुरा फलंदाज म्हणून संघासाठी फलंदाजी करताना दिसला.

हनुमा विहारीने संघासाठी काहीही करण्याची जिद्द दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील बॉर्डर गावसकर ट्रॉफी मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीत दुखापती असूनही टीम इंडियाला सामना वाचून दिला. आता रणजी ट्रॉफी सामना संपल्यानंतर हनुमा विहारी म्हणाला की, आंध्र प्रदेश असो किंवा भारत, नेहमीच जिंकण्यासाठी खेळतो. गरज पडल्यास संघासाठी एका पायावरही खेळू शकतो.

हनुमा विहारीला डाव्या हाताने फलंदाजी करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचे उत्तर देताना तो म्हणाला, मी अगदी लहान असतानाही टेनिस बॉलने क्रिकेट खेळताना डाव्या हाताने फलंदाजी करत होतो. प्रथम श्रेणी सामन्यात तेही उपांत्यपूर्व फेरीत मला डाव्या हाताने फलंदाजी करावी लागेल असे मला कधीच वाटले नव्हते.

टेस्ट मॅचच्या तिसर्‍या दिवशी आंध्र प्रदेश टीमने दुसऱ्या इनिंगमध्ये 76 रन्समध्ये 9 विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यात पहिल्या डावानंतर हनुमाने दुसऱ्या डावातही धैर्य दाखवले आणि एका हातात प्लास्टर घेऊन संघासाठी फलंदाजीसाठी उतरला. एका हाताने खेळताना हनुमाने त्याच्या छोट्या खेळीत 3 चौकार मारले आणि या चौकारांपैकी एक चौकार त्याने रिव्हर्स स्वीप खेळून आला, ज्यावर दिनेश कार्तिकनेही त्याचे कौतुक केले.