IND vs AUS: राहुलच्या हकालपट्टीनंतर टीम इंडियाचा नवा उपकर्णधार कोण? BCCIने रोहितवर सोडला निर्णय

ind vs aus test KL Rahul sacked BCCI leaves Rohit Sharma to decide vice-captain for remaining 2 Tests cricket news in marathi kgm00
ind vs aus test KL Rahul sacked BCCI leaves Rohit Sharma to decide vice-captain for remaining 2 Tests cricket news in marathi kgm00
Updated on

Ind vs Aus Test : कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप ठरणारा भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलची पदावरून हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी त्याच्या जागी उपकर्णधाराची घोषणा केलेली नाही. भारतीय बोर्डाने हा निर्णय कर्णधार रोहित शर्मावर सोपवला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी आता हिटमन भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ठरवणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामने इंदूर आणि अहमदाबाद येथे खेळल्या जाणार आहे.(Rohit Sharma Will Dicide Test Vice Captain)

ind vs aus test KL Rahul sacked BCCI leaves Rohit Sharma to decide vice-captain for remaining 2 Tests cricket news in marathi kgm00
IND vs AUS: ऑस्ट्रेलियात संघात भूकंप! भारताविरुद्धच्या 2 पराभवानंतर कांगारूंचा कर्णधार परतला घरी

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एका सूत्राने सांगितले की, कोणालाही उपकर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याऐवजी रोहित शर्माला अधिकार देण्यात आला आहे की, जर तो मैदान नसेल तर संघाचे नेतृत्व कोण करेल? यापूर्वी केएल राहुलला डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जाहीर झालेल्या भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते.

मात्र त्याच्या खराब फॉर्ममुळे निवडकर्त्यांनी त्याला उपकर्णधारपदावरून हटवले आहे. दिल्लीत खेळल्या गेलेल्या कसोटीनंतर बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी उर्वरित दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली. ज्यामध्ये निवडकर्त्यांनी उपकर्णधारपदासाठी कोणत्याही खेळाडूची निवड केली नाही.

ind vs aus test KL Rahul sacked BCCI leaves Rohit Sharma to decide vice-captain for remaining 2 Tests cricket news in marathi kgm00
WTC Points Table: भारताच्या विजयाचा फटका दक्षिण आफ्रिकेला! WTC शर्यतीतून बाहेर

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर केएल राहुल सध्या खराब फॉर्ममधून आहे. गेल्या एक वर्षापासून त्याला कसोटी सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही. आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या वर्षभरात त्याला एकाही कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावता आलेले नाही.

केएल राहुल गेल्या 5 कसोटी सामन्यांमध्ये एकाही डावात 23 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्याने शेवटचे अर्धशतक जानेवारी 2022 मध्ये कसोटी सामन्यात आले होते. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने पहिल्या डावात 50 धावा केल्या होत्या. तेव्हापासून तो कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.