IND vs AUS : मोहम्मद शमीसमोर 'जय श्रीराम'चे नारे, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहितने सोडले मौन...

 ind vs aus test rohit sharma-breaks-silence-on-viral-video-of-jai-shree-ram-chants-for-mohammed-shami-in-ahmedabad cricket news in marathi
ind vs aus test rohit sharma-breaks-silence-on-viral-video-of-jai-shree-ram-chants-for-mohammed-shami-in-ahmedabad cricket news in marathi

Ind vs Aus Test : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टार भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसमोर 'जय श्रीराम'चे नारे देण्यात आले. व्हायरल व्हिडिओवर आता भारतीय कर्णधार रोहित शर्माने मौन सोडले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेला. या सामन्यादरम्यान स्टेडियममधील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओंबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता या व्हिडिओंबाबत वक्तव्य केले आहे.

 ind vs aus test rohit sharma-breaks-silence-on-viral-video-of-jai-shree-ram-chants-for-mohammed-shami-in-ahmedabad cricket news in marathi
IND vs AUS Playing 11: आता ODI मालिकेचा थरार! कर्णधार हार्दिक पांड्या या खेळाडूंना देणार डच्चू

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे की, त्याने असा कोणताही व्हिडीओ पाहिला नाही किंवा त्याच्याकडे या घटनेची कोणतीही माहिती नाही. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकले आहे आणि तिथे काय झाले ते मला माहित नाही.

 ind vs aus test rohit sharma-breaks-silence-on-viral-video-of-jai-shree-ram-chants-for-mohammed-shami-in-ahmedabad cricket news in marathi
IND vs AUS : कसोटी मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का! ODI मालिकेतून कर्णधार बाहेर

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील हा सलग चौथा मालिका विजय आहे. या विजयासह भारताने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही आपले स्थान निश्चित केले आहे. 7 जून रोजी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर WTC फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com