IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल; जाणून घ्या अपडेट

क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
IND vs AUS test series 2023 Kuldeep Yadav not get place 1st test Nagpur Ravindra Jadeja Chance
IND vs AUS test series 2023 Kuldeep Yadav not get place 1st test Nagpur Ravindra Jadeja Chance

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे होणार आहे. यापूर्वी क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (IND vs AUS test series 2023 Kuldeep Yadav not get place 1st test Nagpur Ravindra Jadeja Chance )

नागपुरमध्ये होणाऱ्या टेस्ट मॅचपूर्वी टीम इंडियामधून मोठी अपडेट समोर आली आहे. या सामन्यासाठी कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कुलदिप यादवऐवजी अष्टपैलू खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी बांगलादेश दौऱ्यावर कुलदीप यादवने त्याच्या किलर फॉर्मचा ट्रेलर दाखवला होता.

चितगाव येथे खेळल्या गेलेल्या त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने 40 धावा केल्या आणि 8 विकेट्सही घेतल्या, ज्यासाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले.

या सामन्यानंतरच कुलदीप यादवला कसोटी संघातून वगळण्यात आले. आता संघ व्यवस्थापन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवू शकते.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाला सहाव्या क्रमांकाचा फलंदाज आणि दुसरा मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देईल.

त्याचवेळी रवींद्र जडेजासह अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अष्टपैलू अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाणार आहे. अशा स्थितीत कुलदीप यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर बसावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com