IND vs AUS: नितीन मेनन रोहितवर मेहरबान विराटला मात्र पाहतात पाण्यात; सोशलवर हे काय सुरू आहे?

ind vs aus test Umpire Nitin Menon Trolled After Not Giving Out Rohit Sharma twice-kohli-fans-trollin india vs Australia 3rd Test Day 1 aas86 kgm00
ind vs aus test Umpire Nitin Menon Trolled After Not Giving Out Rohit Sharma twice-kohli-fans-trollin india vs Australia 3rd Test Day 1 aas86 kgm00

India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज मैदानात आले आणि पॅव्हेलियनमध्ये पण घाईघाईने परतले. सामन्याच्या पहिल्या तासात भारतीय संघाचा निम्मा संघ 'तुम चलो हम चल आये'च्या धर्तीवर पॅव्हेलियनमध्ये परतला. 45 धावांच्या एकूण धावसंख्येवर संघाने पाच विकेट गमावल्या होत्या.

विराट कोहलीही काही विशेष दाखवू शकला नाही. तोही लवकर आऊट आला. होळकर स्टेडियमवर विकेट पडण्यासाठी खेळपट्टीलाही जबाबदार धरले जात आहे. जेव्हा चेंडू खेळपट्टीवर आदळत होता तेव्हा त्यासोबत धूळ उडत होती.

ind vs aus test Umpire Nitin Menon Trolled After Not Giving Out Rohit Sharma twice-kohli-fans-trollin india vs Australia 3rd Test Day 1 aas86 kgm00
IND vs AUS 3rd Test : लाल मातीच्या आखाड्यात टीम इंडियाचे पहिल्याच सत्रात टांगे पलटी घोडे फरार!

दिल्ली कसोटीत पंच नितीन मेनन यांनी वादग्रस्त बाद देण्याचा निर्णय विराट कोहलीचे चाहते विसरलेले नाहीत. आता इंदूर कसोटीत एकाच षटकात दोनदा बाद झाल्यानंतरही रोहित शर्माला जीवदान दिल्याबद्दल चाहते मेननला ट्रोल करत आहेत. इंदूर कसोटीत दोन जीव गेल्यानंतरही रोहितला मोठी खेळी खेळता आली नाही. या वादग्रस्त निर्णयानंतर सोशल मीडियावर भूकंप झाला आहे. विराट कोहलीचे चाहते नितीन मेननवर खूप क्लास लावत आहेत.

ind vs aus test Umpire Nitin Menon Trolled After Not Giving Out Rohit Sharma twice-kohli-fans-trollin india vs Australia 3rd Test Day 1 aas86 kgm00
Bill Gates Met Sachin: बिल गेट्स सचिनचा मेगा प्लॅन; आता लवकरच...

टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ही कसोटी जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकायची आहे. तसेच हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया पहिल्या डावात 109 धावांवर अॉल आऊट झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com