अण्णाच्या जावयाचा कार्यक्रम कुणी केला? संघातून राहूल 'गूल' |KL Rahul Memes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul Memes

KL Rahul Memes : अण्णाच्या जावयाचा कार्यक्रम कुणी केला? संघातून राहूल 'गूल'

Ind Vs Aus third Taste KL Rahul out Playing 11 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा कसोटी सामना मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये होत आहे. पहिले दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारताला हा तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करायची आहे. यासगळ्यात एका खेळाडूची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी उर्फ अण्णा याच्या मुलीचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी केएल राहुलसोबत पार पडला. केएल राहुल हा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आहे. त्यानं आजवर आपल्या प्रभावी कामगिरीनं भारताला जिंकून दिले आहे. मात्र लग्न झाल्यानंतर राहुलचा फ़ॉर्म हरवला की काय असे प्रश्न त्याला नेटकरी विचारत आहे.

Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. तो फ्लॉप झाल्यानं चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यांचा आवडता फलंदाज प्रभावी कामगिरी करत नसल्यानं आता सोशल मीडियावर केएल राहुल नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे. त्यामध्ये त्याला लग्न झालं आणि फॉर्म गेला अशा आशयाच्या प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे.

भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी देखील केएल राहुलच्या खराब कामगिरीवर टीका केली आहे. ते म्हणाले, केएलनं आता त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. त्याच्यामुळे शुभमन गिल सारख्या खेळाडूला डावलण्यात आले होते. हे चांगले नाही. आता वेळ आहे. केएलनं स्वताला सिद्ध करण्याची. अशी टोकदार प्रतिक्रिया प्रसाद यांनी दिली होती.

दरम्यान केएल राहुलवर सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये नेटकऱ्यांनी अण्णाच्या घरात राडा, जावयाला डावलण्यात आल्यानं नाराजी अशा प्रतिक्रिया देऊन लक्ष वेधून घेतले आहे. अखेर तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये राहुलला वगळून शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे राहुल चर्चेत आला आहे.