
IND vs AUS : स्वतःच्या राज्याच्या खेळाडूचे अखेर प्रसादने केलं कौतुक, ट्विट करत म्हणाला...
Venkatesh Prasad tweet on KL Rahul : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मॅचविनिंग इनिंग खेळून सर्वांचे लक्ष वेधले. गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करत असलेल्या केएल राहुलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 75 धावांची नाबाद खेळी करत भारताला मालिकेत आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
यापूर्वी केएल राहुलच्या संघातील स्थानावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि यामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने खूप रस दाखवला होतो. राहुलच्या खराब कामगिरीवर व्यंकटेश प्रसाद टीका करताना दिसले. मात्र एकदिवसीय मालिकेतील राहुलची दमदार कामगिरी पाहून त्याने या फलंदाजाचेही जोरदार कौतुक केले आहे.
केएल राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गासकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली, परंतु तो काही विशेष करू शकला नाही, ज्यामुळे तो व्यंकटेश प्रसाद यांच्यासह अनेक दिग्गजांच्या निशाण्यावर आला.
मात्र, दोन कसोटी सामन्यांतील खराब कामगिरीमुळे केएल राहुलला उर्वरित दोन सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते. त्याने वनडेतील कामगिरी कायम ठेवली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या केएल राहुलबद्दल व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट केले, "केएल राहुलची शानदार खेळी आणि दबावाखाली उत्तम संयम." अव्वल डाव. रवींद्र जडेजाची चांगली साथ आणि भारताचा चांगला विजय.
राहुल फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा भारताने 39 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये परतले होते. चांगली सुरुवात केल्यानंतर राहुलने हार्दिकसोबत 44 धावांची भागीदारी केली. पांड्या 25 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर राहुलने जडेजासोबत मॅच-विनिंग शतकी भागीदारी केली.