Ind vs Aus Final : पॅलेस्टिनचा समर्थक घुसला मैदानात अन् सामना थांबला; फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने...

Ind vs Aus Final
Ind vs Aus Final sakal

Ind vs Aus Final : टीम इंडिया 2023 च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने 20 षटकांत 3 बाद 115 धावा केल्या. पण सामन्यादरम्यान एका पॅलेस्टाईन समर्थकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सध्या इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत आणि हा ट्रेंड अजूनही सुरू आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात पॅलेस्टिनी समर्थक सुरक्षा घेरा तोडून मैदानात घुसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. या घटनेदरम्यान विराट कोहली 29 धावांवर तर केएल राहुल 6 धावांवर खेळत होता. तर हे 14 वे षटक फिरकी गोलंदाज अॅडम झम्पा टाकत होता.

पाकिस्तानी खेळाडूंनी दिला गाझाला पाठिंबा

पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने या वर्ल्ड कपमध्ये हा युद्धाचा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित केला होता. श्रीलंकेविरुद्ध मॅच-विनिंग शतक झळकावल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि आपले शतक गाझाच्या लोकांना समर्पित केले.

यानंतर पाकिस्तान संघातील अनेक खेळाडूंनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पॅलेस्टाईनचे समर्थन केले. यानंतर, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असताना दुसरी घटना उघडकीस आली.

त्यानंतर या सामन्यादरम्यान एक प्रेक्षक स्टँडवर पोस्टर हलवताना दाखवण्यात आला. त्याचा फोटोही चांगलाच व्हायरल होत आहे. त्या दर्शकाने पोस्टरमध्ये लिहिले की, दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा आहे.

या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पण पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावणाऱ्या आणि त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या ४ समर्थकांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी या लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडून जाणून घ्यायचे होते की या लोकांनी असे का केले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com