Ind vs Ban Test Series: टॉप ऑर्डर निश्चित! परंतु गोलंदाजांनी वाढवली डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind vs Ban Test Series

Ind vs Ban Test Series: टॉप ऑर्डर निश्चित! परंतु गोलंदाजांनी वाढवली डोकेदुखी

India vs Bangladesh Test Series : बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका 1-2 ने गमावल्यानंतर टीम इंडियाला आता दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबरपासून चितगाव येथे खेळला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्याच्या जागी केएल राहुल संघाची धुरा सांभाळत आहे. केएलसह शुभमन गिलची सलामी निश्चित दिसते, परंतु जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंशिवाय बॉलिंग कॉम्बिनेशन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची डोकेदुखी वाढवत आहे.

हेही वाचा: FIFA WC22: मेस्सी आता फक्त दोन पावले दूर!

भारताकडे पाच वेगवान गोलंदाज आणि चार फिरकीपटूंचा संघात समावेश आहे. तथापि संघ व्यवस्थापन अनुभवी जोड्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नाही. उनाडकटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजीत चांगली कामगिरी केली असली तरी शार्दुल ठाकूरच्या अनुभवामुळे त्याला संधी मिळणार आहे. मात्र फिरकी विभागात दमछाक झाली आहे. रविचंद्रन अश्विन हे पहिले नाव आहे. अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी सौरभ कुमार आणि कुलदीप यादव यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.

हेही वाचा: IND vs BAN: 'कोणत्याही पत्नीसाठी हा...' इंडियाची जर्सी मिळाल्याने जयदेव उनाडकटचा चेहरा फुलला

भारत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुभमन गिलला सलामीचे स्थान मिळेल कारण तो बॅकअप सलामीवीर आहे. चेतेश्वर पुजारा विराट कोहलीसह चौथ्या क्रमांकावर आपले 3 क्रमांकाचे स्थान कायम ठेवेल. श्रेयस अय्यरला पाचवा क्रमांक मिळेल. सहाव्या क्रमांकावर आश्चर्यकारक कामगिरी करणारा ऋषभ पंत यष्टीमागे आपले काम सुरूच ठेवेल. याचा अर्थ टीम इंडियासाठी केएस भारत हा फक्त बॅकअप पर्याय असेल.

हेही वाचा: KL Rahul- Athiya Shetty महाराष्ट्रात 'या' रम्य ठिकाणी बांधणार लग्नगाठ, समोर आली वेडिंग डेट..

सातव्या क्रमांकापासून ते कठीण होणार आहे. रवींद्र जडेजाशिवाय रविचंद्रन अश्विन सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. मात्र भारतासमोर फिरकीची कोंडी होत आहे. अक्षर पटेलने उपखंडात चांगली कामगिरी केली आहे. लेफ्ट आर्म स्पिनरसाठी भारत सौरभ कुमारची निवड करू शकतो. बांगलादेश अ विरुद्ध भारत अ संघातर्फे सौरभ कुमार हा दोन सामन्यांत 15 बळी घेऊन सर्वोत्तम गोलंदाज ठरला. संघ व्यवस्थापन उत्तर प्रदेशच्या या फिरकीपटूला त्याचे स्वप्नवत पदार्पण देऊ शकते.

शार्दुल ठाकूरला मात्र जयदेव उनाडकटशी स्पर्धा करावी लागणार आहे. जयदेव उनाडकटने देशांतर्गत रेड-बॉल क्रिकेटमध्ये आपल्या चमकदार कामगिरीमुळे स्वतःला सिद्ध केले आहे. तो एक उत्तम फलंदाजही आहे. उमेश यादव आणि मोहम्मद सिराज हे आणखी दोन वेगवान गोलंदाजांची जागा घेतील.