IND vs BAN 1st Test Day-1 LIVE
IND vs BAN 1st Test Day-1 LIVEesakal

IND vs BAN 1st Test Day-1 : पहिल्याच दिवशी बांगलादेशची फिरकी पडली भारी; पुजारा - अय्यरने सावरले

आजपासून कसोटी क्रिकेटचा थरार सुरू

India vs Bangladesh 1st Test Day-1 Live Scorecard :

भारताने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी 6 बाद 278 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून चेतेश्वर पुजाराने 203 चेंडूत 90 धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यर दिवसअखेर 82 धावा करून नाबाद राहिला. ऋषभ पंतनेही 45 चेंडूत 46 धावा ठोकत आपले योगदान दिले. बांगलादेशकडून डावखुरा फुरकी गोलंदाज तैजुल इस्लामने 3 तर मेहदी हसन मिर्झाने 2 विकेट घेत भारताच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडले. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेल 14 धावांवर बाद झाला.

 278-6 : दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर झाला बाद 

मेहदी हसन मिर्झाने पहिल्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलाला 14 धावांवर पायचीत करत भारताला सहावा धक्का दिला.

261-5  : पुजाराचे शतक हुकले

तैजुल अहमदने चेतेश्वर पुजाराला 90 धावांवर बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. अखेर अय्यर आणि पुजाराची 149 धावांची भागीदारी संपुष्टात आली.

IND 207/4 (65) : अय्यर - पुजाराची शतक भागीदारी; भारत 200 पार 

चहापानानंतर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरने आपली अर्धशतके पूर्ण केली. दोघांनीही चौकार मारत आपल अर्धशतक थाटात पूर्ण केले. यानंतर या दोघांनी शतकी भागीदारी देखील पूर्ण केली.

IND 174/4 (56) : चहापान! अय्यर - पुजाराची दमदार भागीदारी 

श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरत नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. चहापानासाठी खेळ थांबला त्यावेळी अय्यर 41 तर पुजारा 42 धावा करून नाबाद होते.

IND 155/4 (46) : भारत दिडशे पार 

ऋषभ पंत आक्रमक 46 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने देखील सेट होण्यास फार वेळ घेतला नाही. त्याने चेतेश्वर पुजारासोबत पाचव्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात करत भारताला 150 च्या पार पोहचवले.

112 धावांवर भारताला मोठा धक्का

112 धावांवर भारताला मोठा धक्का बसला आहे. ऋषभ पंत 46 धावा करून बाद झाला. त्याला मेहंदी हसनने बोल्ड केले. आता श्रेयस अय्यर चेतेश्वर पुजारासह क्रीजवर आहे. भारताची धावसंख्या 34 षटकांनंतर 4 बाद 121 अशी आहे.

पुजारा पंतची अर्धशतकी भागीदारी

चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. पंत वेगाने धावा करत आहे. पुजारा सावधपणे खेळत आहे. या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा संकटातून बाहेर काढले आहे.

पहिल्या दिवशी लंचपर्यंत भारताची धावसंख्या 85/3

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत पहिल्या दिवसाचे पहिले सत्र खेळले गेले आहे. लंचपर्यंत भारताने 26 षटकांत तीन गडी गमावून 85 धावा केल्या होत्या. चेतेश्वर पुजारा 32 चेंडूत 12 आणि ऋषभ पंतने 26 चेंडूत 29 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे. शुभमन गिल, केएल राहुल आणि विराट कोहली भारताकडून मोठी खेळी खेळू शकले नाहीत. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने दोन आणि खालेद अहमदने एक विकेट घेतली.

केएल राहुल आउट

19 व्या षटकात टीम इंडियाला दूसरा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलला बोल्ड झाला. राहुल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता पण बॅटला आदळल्यानंतर चेंडू स्टंपला लागला. राहुलने 54 चेंडूत 22 धावा केल्या.

पहिल्या तासात टीम इंडियाला पहिला धक्का!

भारताने 13 षटकात 41 धावा केल्या होत्या. यानंतर 14व्या षटकात तैजुल इस्लामने शुभमन गिल बाद केले. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गिल स्वीप करण्याचा प्रयत्न करत होता पण चेंडू बॅटच्या वरच्या काठाला लागला आणि लेग साइडवर तो झेल झाला. गिलने 40 चेंडूत 20 धावा केल्या.

भारताच्या डावाला सुरूवात

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार राहुल आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली आहे. बांगलादेशकडून इबादत हसनने पहिले षटक केले.

भारत तीन फिरकी गोलंदाजांसह उतरला मैदानात

या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्याशिवाय या सामन्यात कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजी उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांच्यावर अवलंबून आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com