Ind vs Ban 2nd Test: हुश्श जिंकलो एकदाचे! भारताचा बांगलादेशला क्लीन स्वीप

India vs Bangladesh 2nd Test Day 4 Live Cricket Score
India vs Bangladesh 2nd Test Day 4 Live Cricket Scoresakal

India vs Bangladesh 2nd Test Day 4 Live Cricket Score : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळल्या गेला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी 7 गडी गमावून 145 धावांचे लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह भारताने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला.

या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला आणि भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेट्सच्या मोबदल्यात 45 धावा केल्या होत्या.

श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन धुरा सांभाळली

श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळली आहे. दोघांनी संघाची धावसंख्या सात विकेट्सवर 106 धावांपर्यंत नेली. अय्यर 22 आणि अश्विन 10 धावांवर खेळत आहेत. टीम इंडियाला विजयासाठी 39 धावांची गरज आहे.

भारताला सातवा धक्का

मेहदी हसन मिराजने भारताला सातवा धक्का दिला आहे. त्याने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड केले. अक्षर 69 चेंडूत 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या बाद झाल्यानंतर टीम इंडिया अडचणीत आली आहे. कसोटी जिंकण्यासाठी आणखी 71 धावा करायच्या आहेत. त्याने 30 षटकांत सात विकेट्स गमावत 74 धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन श्रेयस अय्यरसोबत क्रीजवर आहे.

ऋषभ पंतने पण सोडली साथ! टीम इंडियाला सहावा धक्का

चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताला सर्वात मोठा धक्का ऋषभ पंतच्या रूपाने बसला. त्याला मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू केले. पंत 13 चेंडूत 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मेहदीचा चेंडू थेट त्याच्या पॅडवर आदळला. पंतनंतर श्रेयस अय्यर क्रीझवर आला. टीम इंडियाने 29 षटकात 6 विकेट गमावत 74 धावा केल्या आहेत. त्याला विजयासाठी आणखी 71 धावा करायच्या आहेत.

भारताला पाचवा धक्का

दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताकडून बाद होणारा जयदेव उनाडकट हा पहिला फलंदाज ठरला. त्याला शकीब अल हसनने एलबीडब्ल्यू केले. उनाडकटने 16 चेंडूत 13 धावा केल्या. त्याने रिव्ह्यू घेतला पण तो व्यर्थ गेला आणि भारताला पाचवा धक्का बसला. उनाडकट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत क्रीजवर आला आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताला विजयासाठी आणखी 100 धावांची गरज आहे. त्याची धावसंख्या चार विकेट्सवर 45 धावा आहे. अक्षर पटेलसह जयदेव उनाडकट क्रीजवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com