Ind vs Ban : 'मला माफ कर मित्रा...', सामनावीर बनल्यानंतर कोहलीने जडेजाची मागितली माफी, जाणून घ्या प्रकरण

ind vs ban Virat Kohli apologizes to Ravindra Jadeja
ind vs ban Virat Kohli apologizes to Ravindra Jadejasakal
Updated on

Virat Kohli apologizes to Ravindra Jadeja : विराट कोहलीचे शतक आणि भारताचा चौथा विजय असा दुग्धशर्करा योग गहुंजे स्टेडियमवर घडला. एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने अपेक्षेप्रमाणे बांगलादेशचा एकतर्फी पराभव करून आपली दणदणीत वाटचाल कायम ठेवली.

ind vs ban Virat Kohli apologizes to Ravindra Jadeja
Rohit Sharma on Hardik Pandya: वर्ल्ड कपमध्ये उर्वरित सामने नाही खेळणार उपकर्णधार हार्दिक पांड्या? रोहितने दिली मोठी अपडेट

फलंदाजी सोपी असली तरी भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 256 धावांवर रोखले आणि त्यानंतर हे आव्हान 41.3 षटकांत पार केले. कोहलीने षटकार मारून आपले शतक पूर्ण केले आणि तेव्हाच भारताच्या विजयावरही शिक्कामोर्तब झाले. त्या अगोदर रोहित शमनि 48 तर, शुभमन गिलने 53 धावा करून भारताचा विजय सोपा केला होता.

भारताचा पुढचा सामना रविवारी न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथे होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामना संपल्यानंतर विराट कोहलीने रवींद्र जडेजाची माफी मागितली.

ind vs ban Virat Kohli apologizes to Ravindra Jadeja
World Cup: देवमाणूस ! विराटचं ४८वं शतक तर झालं पण, अंपायरचं सर्वत्र का होतय कौतुक?

सामन्यानंतर कोहली म्हणाला की, जडेजाने या सामन्यात अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. त्याने मोलाच्या विकेट्सही मिळवल्या. जडेजा तेवढ्यावर थांबला नाही तर त्याने अफलातून कॅचही पकडला. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीर हा पुरस्कार मिळू शकला असता. पण शतकानंतर मी त्याच्याकडून सामनावीर हा पुरस्कार हिरावून घेतला आहे. त्यामुळे मी त्याची माफी मागतो.

पुढे बोलताना तो म्हणाला की, या वर्ल्ड कप मध्ये मी दोन अर्धशतके झळकावली आहेत पण यावेळी मला शतक पूर्ण करायचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com