Video: विराट, इशांत अन् DRS... पाहा मैदानावर नक्की काय घडलं

Virat-Ishant-DRS
Virat-Ishant-DRS

पंत आणि रोहित शर्मादेखील जवळच उभे होते पण...

Ind vs Eng 2nd Test Day 5: मोहम्मह शमीचे अर्धशतक (५६*) आणि जसप्रीत बुमराहने (३४*) दिलेली साथ याच्या बळावर भारताने इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. हमीद हसीबने काही काळ झुंज दिली पण तोदेखील ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अनुभवी जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत असताना एक घटना घडली.

Virat-Ishant-DRS
IND vs ENG: अरेरे... इतिहासात इंग्लंडवर प्रथमच आली अशी वेळ!

बेअरस्टो या फटकेबाजीसाठी ओळखला जाणार फलंदाज आहे. पण सामना वाचवण्यासाठी तो संथगतीने खेळत होता. इशांतचा इनस्विंग चेंडू त्याच्या पायाला लागला आणि भारतीय खेळाडूंनी अपील केलं. पण पंचांनी बेअरस्टोला नाबाद ठरवलं. पंत आणि रोहित शर्मा विराटच्या जवळच उभे होते पण चेंडूचा नक्की अंदाज इशांत आला असणार म्हणून विराटने इशांतला विचारलं. पण इशांतने ठोस उत्तर दिलं नाही. अखेर अवघी काही सेकंद असताना विराटने DRS चा आधार घ्यायचं ठरवलं आणि तोच निर्णय फायद्याचा ठरला.

पाहा व्हिडीओ-

Virat-Ishant-DRS
Video: शमी-बुमराहचं 'स्वॅग से स्वागत'; शास्त्री गुरूजींही खुश

विराटने शेवटच्या क्षणाला घेतलेला रिव्ह्यू यशस्वी ठरल्यामुळे विराटचा आनंद गगनात मावेनासा झाला. बेअरस्टोला पंचांनी बाद घोषित केल्यावर विराट अक्षरश: लहान मुलाप्रमाणे आनंद व्यक्त करताना दिसला.

असा रंगला भारताचा दुसरा डाव

भारताचा पहिला डाव ३६४ वर तर इंग्लंडचा ३९१ वर आटोपल्याने यजमानांना २७ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताकडून लोकेश राहुल (५) रोहित शर्मा (२१) आणि विराट कोहली (२०) लवकर बाद झाले. रहाणे-पुजारा जोडीने डाव सावरला. पुजाराने २०९ चेंडूत ४५ तर अजिंक्यने १४६ चेंडूत ६१ धावा केल्या. त्यानंतर जाडेजा (४), ऋषभ पंत (२२) आणि इशांत शर्मा (९) हे स्वस्तात बाद झाले. पण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी सामन्याचा नूरच बदलला. शमीचे दमदार अर्धशतक (५६*) आणि बुमराहची त्याला लाभलेली साथ (३४*) यामुळे भारताने ८ बाद २९८ धावांपर्यंत मजल मारली आणि डाव घोषित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com