BCCI नं राखली मर्जी; टीम इंडियाला मिळाला नवा भिडू पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI नं राखली मर्जी; टीम इंडियाला मिळाला नवा भिडू पण...

BCCI नं राखली मर्जी; टीम इंडियाला मिळाला नवा भिडू पण...

इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात आणखी एका युवा खेळाडूचा समावेश झालाय. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयच्या निवड समितीने संघ व्यवस्थापनाच्या विनंतीवरुन जलदगती युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतलाय. प्रसिद्ध कृष्णा इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासोबत होता. राखीव खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होता. पण आता चौथ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनसाठी तो उपलब्ध असेल.

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यातील मालिकेतील तीन सामन्यानंतर दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. 2 सप्टेंबरपासून लंडनस्थित द ओव्हलच्या मैदानात चौथा कसोटी सामना रंगणार आहे. नाँटिंघमच्या मैदानातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला होता. त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखण्यात भारतीय संघाला अपयश आले. यजमान इंग्लंडने लीड्सच्या मैदानावर भारतीय संघाला 76 धावा आणि डावाने पराभूत करत मालिकेत बरोबरी साधली आहे.

प्रसिद्ध कृष्णाची टीम इंडियात वर्णी लागली असली तरी चौथ्या कसोटीसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे मुश्किलच दिसते. सध्याच्या घडीला भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या अनुभवी गोलंदाजांसह युवा मोहम्मद सिराजला पसंती मिळताना दिसते. त्यामुळेच प्रसिद्ध कृष्णाला कसोटीत प्रसिद्ध मिळणं कठीण आहे.

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), विराट कोहली (कर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, ऋद्धिमान साहा, अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शा, सूर्यकुमार यादव. प्रसिद्ध कृष्णा.