esakal | IND vs ENG 4th Test: इशांत, शमी संघातून बाहेर; पाहा Playing XI
sakal

बोलून बातमी शोधा

Ishant-Sharma-Mohd-Shami

IND vs ENG 4th Test: इशांत, शमी संघाबाहेर; पाहा Playing XI

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng 4th Test: टॉस जिंकून इंग्लंडची प्रथम गोलंदाजी

India vs England 4th Test Live Updates: कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत असताना चौथ्या कसोटीचा टॉस (Toss) इंग्लंडचा (England) कर्णधार जो रूटने (Joe Root) जिंकला आणि भारताला (Team India) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघात अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (Ashwin) खेळणार का? हा प्रश्न साऱ्यांच्याच मनात होता. विराटने (Virat Kohli) टॉसच्या वेळी संघात दोन बदल असल्याचे सांगितले पण त्या बदलांमध्ये उमेश यादव (Umesh Yadav) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) या दोन वेगवान गोलंदाजांना संघात संधी मिळाली. मोहम्मद शमी (Mohd Shami) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) हे दोघेही दुखापतीमुळे (Niggles) संघाबाहेर असल्याचे विराटने सांगितले. पण अश्विनला मात्र संघात अद्यापही स्थान देण्यात आलेले नाही. इंग्लंडनेदेखील दोन बदल केले. ओली पोप आणि ख्रिस वोक्स या दोघांना जोस बटलर आणि सॅम करन यांच्या जागी संघात स्थान मिळाले.

पाहा दोन्ही संघाचे Playing XI-

भारतीय संघ- रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मज सिराज

इंग्लंडचा संघ- रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, ओली रॉबिन्सन, ओली पोप, ख्रिस वोक्स, जिमी अँडरसन.

आर अश्विन पुन्हा चर्चेत

भारतीय संघात रविचंद्रन अश्विनला स्थान देण्याबाबत सोशल मिडीयावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण भारतीय संघाने केलेल्या दोन बदलांमध्ये अश्विनला संधी देण्यात आली नाही. याबद्दल विराट कोहलीला विचारले असता, तो म्हणाला की आमचे वेगवान गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजी करतात. त्यांच्या पायांच्या ठशाचा उपयोग जाडेजाला जास्त होऊ शकतो. तसेच, आमची सलामी जोडी दमदार खेळ करत आहे. अशा वेळी फलंदाजीत दम असायला हवा. आम्ही आता कोणतीही जोखीम उचलण्यास तयार नाही.

दरम्यान, अश्विनला संधी न देता उमेश यादवला संघात स्थान दिल्यामुळे सोशल मिडीयावर विराट आणि कोच रवी शास्त्री यांच्यावर चाहत्यांनी प्रचंड टीका केली.

loading image
go to top