esakal | शार्दूल ठाकूरचा इंग्लंडला मराठमोळा दणका! षटकार ठोकत केलं अर्धशतक
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul-Thakur-Fifty

शार्दूलचा इंग्लंडला मराठमोळा दणका! षटकार ठोकत केलं अर्धशतक

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng 4th Test: ७ चौकार अन् ३ षटकारांसह केली धमाकेदार खेळी

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे ढेर झाल्यानंतर शार्दूल ठाकूरने आपला जलवा दाखवला. रोहित, राहुल, विराट, पुजारा, पंत आणि जाडेजा साऱ्यांनीच निराशा केली. पण शार्दूल ठाकूरने इंग्लंडला मराठमोळा दणका दिला. वरच्या आणि मधल्या फळीतील खेळाडू झटपट बाद झाल्यावर शार्दूलने धडाकेबाज खेळी करत अर्धशतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केवळ ३६ चेंडूत ५७ धावा कुटल्या. भारताच्या संपूर्ण डावात शार्दूलची धावसंख्या सर्वोत्तम ठरली. पण शार्दूल बाद झाल्यावर भारताचा डाव लगेच संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात १९१ धावा केल्या.

त्याआधी, टॉस जिंकून जो रूटने भारताला फलंदाजी दिली. रोहित (११), राहुल (१२), चेतेश्वर पुजारा (४), जाडेजा (१०) चौघे झटपट बाद झाले. भारताने लवकर चार गडी गमावल्यानंतर कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रहाणे यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. २२ धावांवर असताना कोहलीला जीवदान मिळालं होतं. त्यानंतर विराटने अर्धशतक झळकावलं. त्याने ९६ चेंडूत ८ चौकारांसह ५० धावा केल्या. पण तो बाद झाल्यावर अजिंक्य रहाणे (१४) आणि ऋषभ पंतही (९) पटकन बाद झाले. त्यानंतर शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव यांनी दमदार अर्धशतकी भागीदारी केली. शार्दूलने अर्धशतक ठोकल्यानंतर तो बाद झाला आणि मग भारताचा डाव झटपट संपला.

loading image
go to top