esakal | VIDEO : इंग्लिश मॅनची कुरापत; कोहलीला खटकली; कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

VIDEO : इंग्लिश मॅनची कुरापत; कोहलीला खटकली; कारण...

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India, 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात द ओव्हलच्या मैदानात चौथा कसोटी सामना सुरु आहे. सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवशी भारताचा ऑल आउट झाला. एवढेच नाही तर इंग्लंडनेही दिवसाअखेर तीन विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले. क्षणात रंग बदलणाऱ्या खेळपट्टीवर इग्लंडच्या फलंदाजाने केलेले कृत्यही चांगलेच चर्चेत आहे.

चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीद खेळपट्टीवर शूजनं क्रीजमध्ये मार्क निर्माण करताना दिसला. गार्ड घेण्याच्या बहाण्यानं त्यानं केलेले कृत्य विराट कोहलीला चांगलेच खटकले. त्यानंतर कोहलीने थेट मैदानातील पंचाकडे धाव घेतली. हमीदनं केलेल्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. त्याच्या अंदाजाचा त्याला फार काही फायदा झाला नाही. जसप्रीत बुमराहने त्याला खातेही न उघडता तंबूत धाडले. 12 चेंडू खेळून तो शून्यावह बाद झाला.

हेही वाचा: विराटचा मैदानाबाहेर विक्रम; अशी कामगिरी करणारा आशियातील पहिलाच!

जसप्रीत बुमराहच्या दोन विकेट्स आणि उमेश यादवने मिळवलेल्या एक विकेटच्या मोबदल्यात इंग्लंडने दिवसाअखेर 53 धावा केल्या होत्या. क्रिकेटच्या मैदानात ज्यावेळी फलंदाज येतो त्यावेळी खेळण्यापूर्वी गार्ड घेऊन मार्क निश्चित करत असतो. अनेक फलंदाज बॅटने तर काही फलंदाज शूजने क्रीजवर मार्क करताना दिसते. आयसीसीच्या नियमावलीनुसार क्रीजपासून 5 फूटाच्या बाहेर गार्ड घेता येत नाही. धाव घेतानाही फलंदाजाला या टप्प्यात धावता येत नाही. हमीदने नियमाचे उल्लंघन करताच कोहलीने पंचाकडे तक्रार केली.

loading image
go to top