Jasprit Bumrah : अखेर ठरलं! जसप्रीत बुमराहच टीम इंडियाचं नेतृत्व करणार

IND vs ENG: जसप्रीत बुमराह बनला टीम इंडियाचा कर्णधार, BCCI ने केले जाहीर
Jasprit Bumrah
Jasprit Bumrahsakal

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबेस्टन कसोटी सामन्यासाठी भारताचे नेतृत्व जसप्रीत बुमराहच करणार आहे. याबाबतची घोषणा बीसीसीआयने नुकतीच केली. भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने तो सध्या विलगिकरणात आहे. तेव्हापासूनच संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. (ind vs eng 5th test jasprit bumrah to lead india vs england rohit sharma sports cricket)

भारताच्या गेल्या इंग्लंड दौऱ्यात स्थगित झालेली पाचवी कसोटी 1 जुलै पासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट आणि जेम्स अँडरसन अशी वेगावान फळी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांच्या संघात जॅक लिच हा एकमेव फिरकीपटू आहे. याचबरोबर कर्णधार बेन स्टोक्स देखील वेगवान गोलंदाजी करतो. त्यामुळे इंग्लंड चार वेगवान आणि एक फिरकीपटू असे कॅम्बिनेशिन घेऊन उतरणार आहे.

भारताने आपला प्लेईंग इलेव्हन अजून जाहीर केलेला नाही. मात्र कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाही हे पक्के झाले आहे. याचा अर्थ टीम इंडियाची सलामी जोडी काय असणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो. भारताच्या डावाची सुरूवात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल करणार की रोहितची रिप्लेसमेंट म्हणून पाठवण्यात आलेला मयांक अग्रवाल गिलसोबत सलामी देणार हे पहावे लागेल. इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन ही आदल्याच दिवशी जाहीर केली आहे. मात्र भारत बहुदा खेळपट्टी पाहून निर्णय घेईल असे दिसते. आता भारत दोन फिरकीपटू घेऊन उतरणार की एक हे उद्याच समजणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com