IND vs ENG: इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा 'टीम इंडिया'ला सल्ला

Team India
Team IndiaFile Photo
Updated on

तिसऱ्या कसोटीसाठी एका खेळाडूचं सुचवलं नाव

Ind vs Eng 3rd Test: भारत-इंग्लंड मालिकेतील पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना दणदणीत १५१ धावांनी जिंकला. सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने एकाकी झुंज दिली. पण 'टीम इंडिया'कडून मात्र सर्व खेळाडूंना खास खेळी केली. पहिल्या खेळाडूपासून ते अकराव्या खेळाडूपर्यंत प्रत्येकाने आपली भूमिका चोख बजावली. असे असले तरी भारतीय संघात एक बदल करावा आणि रविचंद्रन अश्विन याला संघात स्थान मिळायला हवी, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने व्यक्त केले.

Team India
IND vs ENG: बुमराहसोबतच्या राड्याबद्दल अखेर अँडरसनने सोडलं मौन

"हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येणारा आठवडा हा लख्ख प्रकाशाचा असेल. पावसाची चिन्हे नसतील. त्यामुळे पिच अतिशय कोरडं असेल आणि फिरकीला पोषक वातावरण मिळेल. अशा परिस्थितीत टीम इंडियाने अश्विनला संघात स्थान दिलं नाही तरच नवल आहे. मला असं वाटतं की या सामन्यासाठी भारतीय संघ आपला पॅटर्न बदलेल. भारत मैदानात दोन स्पिनर आणि तीन वेगवान गोलंदाज घेऊन उतरेल. हेडिंग्ले येथील मैदानावर हाच पॅटर्न अधिक योग्य असेल", असे मायकल वॉन 'क्रिकबझ'शी बोलताना म्हणाला.

R Ashwin
R Ashwin
Team India
IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी यजमानांना मोठा धक्का

"हेडिंग्ले लीड्सच्या मैदानावरील खेळपट्टी फिरकीला पोषक असू शकेल, असा अंदाज आहे. ही खेळपट्टी फलंदाजांनाही पोषक ठरू शकते. त्यामुळे तीन वेगवान गोलंदाजांना संधी द्यायला हवी आणि दोन फिरकीपटू खेळवायला हवेत. कदाचित अश्विनला संघात इशांत शर्माच्या जागी संधी मिळू शकेल", असेही वॉन म्हणाला.

Team India
IND vs ENG: सिराजने लॉर्ड्सवर मोडला कपिल देव यांचा विक्रम

तिसऱ्या कसोटीसाठी भारत Playing XIमध्ये बदल करेल का?

तिसरी कसोटी लीड्सच्या मैदानावर २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा संघ दोन दिवसांपूर्वीच लीड्सवर दाखल झाला. BCCI ने ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली होती. पहिल्या दोन सामन्यात विराट कोहली आणि भारताच्या गोलंदाजांची फळी ही सध्या चांगल्या पद्धतीने खेळत आहे. त्यामुळे ते संघाबाहेर होणे शक्य नाही. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी संयमी आणि शानदार खेळी केली. त्यामुळे त्या दोघांपैकी कोणालाही वगळून सूर्यकुमारला संघात स्थान मिळणं जरा कठीणच आहे. त्याचसोबत पृथ्वी शॉ यालाही संघात स्थान मिळण्याची शक्यता धूसर आहे. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर दमदार कामगिरी करत असल्याने त्याला संधी मिळणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे भारत स्वत:च्या संघात कोणताही बदल करेल असं वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com