Video: आनंदाची बातमी! रोहित शर्मा कोविडला हरवून झाला टीममध्ये सामील | Rohit Sharma Covid Test Negative | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs eng rohit sharma covid test negative

आनंदाची बातमी! रोहित शर्मा कोविडला हरवून झाला टीममध्ये सामील - Video

रोहित शर्माबाबत टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रोहितची कोरोना चाचणी निगेटिव्ह आला आहे. त्‍याला इंग्‍लंड विरुद्धच्‍या 5व्‍या कसोटीतून (IND vs ENG) बाहेर बसायला लागलं होत. त्याच्या जागी संघाची कमान जसप्रीत बुमराह सांभाळत आहे. बीसीसीआयने नुकतेच टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. त्यामध्ये रोहित शर्माकडे दोन्ही संघांची कमान सोपवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत तो इंग्लंडविरुद्ध ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग बनणार आहे. आयपीएल 2022 पासून रोहित आतापर्यंत एक पण आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.(rohit sharma covid test negative)

हेही वाचा: KL राहुल अन् गर्लफ्रेंड अथिया शेट्टीमध्ये भांडण? एअरपोर्टवर दिसले नाराज- Video

रोहित शर्माचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. लेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा फलंदाजीला आला. मात्र त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याने सामन्यातून बाहेर पडला होता. संघातील इतर खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पाचवी कसोटी 5 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे विराट कोहलीसह 5 वरिष्ठ खेळाडूंना टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाला इंग्लंडनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचं आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड होणार आहेत. अशा परिस्थितीत आता संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड अशा खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छितात ज्यांची T20 वर्ल्डसाठी निवड होऊ शकते. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली नव्हती.

हेही वाचा: 'क्रिकेटचे कलाकार' ऋषभ पंतवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव

पहिल्या टी-20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जॅस्पीनो बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि उमरान मलिक.

वनडे मालिकेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रणंद कृष्णा, मोहम्मद शमी, शमी मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

Web Title: Ind Vs Eng Rohit Sharma Covid Test Negative Will Come Out Isolation Today Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..