IND vs ENG T20 Series : अभिमानास्पद! भारतीय महिला क्रिकेट संघात कोकणची 'प्रकाशिका' चमकणार; अष्टपैलू म्हणून निवड

क्रिकेट मंडळाने जाहीर केलेल्या निवड यादीत तिची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
Prakashika Naik Indian Women's Cricket Team
Prakashika Naik Indian Women's Cricket Teamesakal
Summary

इंग्लंड देशाचा अ संघ भारत देशाच्या दौऱ्यावर येत आहे. मालिकेतील टी-२० सामन्यांना २९ नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होत आहे.

ओरोस : भारतीय महिला क्रिकेट संघात (Indian Women's Cricket Team) आंबडोस (ता. मालवण) गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक (Prakashika Naik) हिची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय टी-२० महिला क्रिकेट स्पर्धेत तिने मुंबई संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्यामुळे क्रिकेट मंडळाने जाहीर केलेल्या निवड यादीत तिची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. शाळा स्तरापासून क्रिकेट खेळाची आवड असलेल्या प्रकाशिका हिने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. सुरुवातीला भारताच्या १९ वर्षांखालील महिलांच्या संघात स्थान प्राप्त केल्यानंतर ती मुंबई महिला संघाची उपकर्णधार झाली होती.

Prakashika Naik Indian Women's Cricket Team
Pankaj Advani : पंकज अडवाणीने पुन्हा केली कमाल; जागतिक बिलियड्‌र्स अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर उमटवली मोहोर

त्यानंतर ती कर्णधार म्हणून कार्यरत होती. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय टी-२० स्पर्धेत मुंबई संघाला विजेतेपद मिळाले आहे. यामध्ये प्रकाशिका हिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे तिची भारतीय महिला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली. ती उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते.

तिने लेगस्पिनर म्हणून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ‘स्लिप’मधील स्पेशालिस्ट म्हणूनही तिची ओळख आहे. ती उत्तम फलंदाज आहे. प्रकाशिकाच्या निवडीने आपल्या गावाचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचणार असल्याच्या भावना आंबडोसवासीयांकडून व्यक्त होत आहे.

Prakashika Naik Indian Women's Cricket Team
Team India : BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये! वर्ल्ड कपमधील पराभवानंतर रोहित सोडणार कर्णधारपद?

इंग्लंडसोबत खेळणार

इंग्लंड देशाचा अ संघ भारत देशाच्या दौऱ्यावर येत आहे. मालिकेतील टी-२० सामन्यांना २९ नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होत आहे. ता. २९ नोव्हेंबर आणि १, ३ डिसेंबर असे एकूण तीन सामने आहेत. यामध्ये प्रकाशिका खेळणार आहे.

Prakashika Naik Indian Women's Cricket Team
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध खेळणार T20 मालिका! संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

भारतीय महिला क्रिकेट संघात खेळण्याचे माझे स्वप्न होते. यासाठी मी प्रचंड मेहनत घेत इथपर्यंत पोहोचली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टी- २० स्पर्धेत प्रथमच विजेतेपद मिळाले. त्यात मला योगदान देता आले. विश्वचषक स्पर्धेत मला भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. भारताला विश्वचषक जिंकून द्यायचा आहे.

-प्रकाशिका नाईक, युवा क्रिकेटपटू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com