विराटमुळे जॉनी बेयरस्टो 'पुजाराचां पंत' झाला; सेहवाग ट्विट व्हायरल | Kohli Sledging Bairstow Statement Sehwag | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kohli Sledging Bairstow Statement Sehwag

विराटमुळे जॉनी बेयरस्टो 'पुजाराचां पंत' झाला; सेहवाग ट्विट व्हायरल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीतील तिसरा दिवसाचा खेळ सुरू आहे. पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने या सामन्यात आपले पूर्णपणे वर्चस्व दाखवले आहे. पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात जोरदार वादाने झाली. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात मैदानावर वाद झाला. टीम इंडियाच्या 416 धावांसमोर इंग्लंडने पहिल्या डावात 284 धावा केल्या. (ind vs eng virat kohli sledging jonny bairstow virender sehwag statement)

हेही वाचा: IND vs ENG Day 3 LIVE: टी ब्रेक नंतर; भारताला दुसरा धक्का

इंग्लंडसाठी या धावसंख्येपर्यंत नेण्यात जॉनी बेअरस्टोने सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 106 धावांची खेळी केली. तिसर्‍या दिवसाच्या सुरुवातीला बेअरस्टोची फलंदाजी खूपच संथ होती, पण विराट कोहलीसोबत झालेल्या जोरदार वादामुळे त्याच्या फलंदाजीत वेग आला. यानंतर बेअरस्टोने टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगलीच हजेरी घेतली. कोहली आणि बेअरस्टो यांच्यातील या वादाला भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने अनावश्यक म्हटले आहे. पुजारासारखा खेळत असलेल्या बेअरस्टोला कोहलीने स्लेज करून पंत बनवले.(kohli sledging bairstow)

हेही वाचा: Video Viral: जॉनी बेअरस्टोच्या विकेटवर कोहलीचे खास सेलिब्रेशन

सेहवागने ट्विटमध्ये लिहिले की, कोहलीच्या स्लेजिंगपूर्वी जॉनी बेअरस्टो 21 च्या स्ट्राइक रेटने खेळत होता आणि नंतर तो 150 च्या खेळायला लागला. तो पुजारासारखा खेळत होता, पण कोहलीने विनाकारण स्लेजिंग करून पंत बनवले. सेहवागशिवाय न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशमनेही कोहलीला ट्रोल केले. नीशम म्हणाला की बेअरस्टो चिडल्यावर 10 पट चांगला खेळतो.

Web Title: Ind Vs Eng Virat Kohli Sledging Jonny Bairstow Cheteshwar Pujara To Rishabh Pant Virender Sehwag Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..