IND vs ENG: विराट, रूटला आधी दंड अन् त्यातच बसला आणखी एक दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Root

IND vs ENG: विराट, रूटला आधी दंड अन् त्यातच बसला आणखी एक दणका

Ind vs Eng 1st Test: टीम इंडिया आणि इंग्लंड (Ind vs Eng 1st Test) यांच्यातील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली खेळी केली. पण पावसाने (Rain Stopped Play) सामना अनिर्णित ठेवायला भाग पाडले. त्यामुळे दोनही संघांना कसोटी अजिंक्यपदाचे गुण वाटून देण्यात आले. दोन्ही संघांना २-२ गुण विभागून देण्यात आले पण त्यासोबत एका गोष्टीमुळे दोन्ही संघाचे २-२ गुण वजाही करण्यात आले.

हेही वाचा: ICC Test Rankings: बुमराह Top 10मध्ये, विराटची क्रमवारीत घसरण

कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ या स्पर्धेत पहिलाच सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी २ गुण मिळाले, पण चार दिवसांचा जो खेळ झाला त्यात या दोन्ही संघांनी षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी या दोघांनाही दंड ठोठवण्यात आला. दोन्ही संघांना सामन्याच्या मानधनापैकी ४० टक्के मानधन दंड म्हणून भरण्याचे आदेश सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दिले. त्यासोबतच दोन्ही संघांचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील २-२ गुण वजा करण्यात आले.

WTC-Points-Table

WTC-Points-Table

चार दिवस झालेल्या खेळात दोन्ही संघांकडून नियमापेक्षा दोन षटकांची गती कमी राखली कमी षटके टाकली गेली. त्यामुळे दोनही कर्णधारांना त्याचा फटका बसला. त्यामुळे दोन्ही संघांचे दोन-दोन गुण कमी करण्यात आले. आता पहिल्या सामन्यानंतर दोन्ही संघांचे २-२ गुण आहेत.

दरम्यान, पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ होऊच शकला नाही आणि सामना अनिर्णित (Match Drawn) राहिला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक ठोकले. पण विराटला मात्र एकमेव डावात शून्यावर बाद व्हावे लागले.

loading image
go to top