Shubhman Gill : ' शुभमनला जो आऊट करेल त्याला १०० रुपये बक्षीस'; वडिलांची ती पैजे अन्…

IND vs NZ 1st odi shubman gill fathers bet made him better cricketer know shubman gills career
IND vs NZ 1st odi shubman gill fathers bet made him better cricketer know shubman gills career

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले आहे. त्याच्या शतकानंतर सगळीकडे त्याच्या तडाखेबाज फलंदाजीची चर्चा होते आहे. शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. आपल्या स्फोटक खेळीत गिलने 19 चौकार आणि 9 षटकार मारले आणि त्याचा स्ट्राइक रेट 140 च्या आसपास होता.

सन 2018 च्या अंडर 19 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलवर तेव्हापासून सर्वांचीच नजर होती. आजच्या त्याच्या द्विशतकी खेळीने चाहत्यांना वेगळाच आनंद दिला. आज आपण शुभमन गिल बद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल सध्या खूप चर्चेत आहे. शुभमन गिल मूळचा पंजाबचा असून तो अगदी लहानपणापासूनच क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. शुभमनला क्रिकेटचे चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून त्याचे वडील मोहालीला शिफ्ट झाले होते.

हेही वाचा - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू शुभमन गिल याचा जन्म 8 सप्टेंबर 1999 रोजी फाजिल्का, पंजाब येथे झाला. त्याचे वडील लखविंदर सिंग गिल हे शेतकरी आहेत आणि आई किरत गिल गृहिणी आहेत.

IND vs NZ 1st odi shubman gill fathers bet made him better cricketer know shubman gills career
Shubman Gill: 9 षटकार 19 चौकार! फक्त 28 चेंडू अन् 130 धावा; गिलने मोडले अनेक विश्वविक्रम

शुभमनने वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांसोबत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. लहान असताना तो वडिलांसोबत क्रिकेट खेळायचा. जसा मोठा झाला त्याचा खेळ सुधरावा म्हणून वडिलांनी एक युक्ती केली. त्यांनी आपल्या शेतातच मैदान बनवले आणि जो आपल्या मुलास आऊट करेल त्याला 100 रुपयांचे बक्षीस जाहीर केलं.

त्यामुळे शुभमन दररोज अनेक तास फलंदाजीचा सराव करायचा.तसेच अनेक खेळाडू 100 रुपये मिळतील म्हणून शुभमनला आऊट कारणासाठी गोलंदाजी करायला येत. हेच शुभमनचा खेळ सुधारण्यासाठी उपयोगी ठरले.

IND vs NZ 1st odi shubman gill fathers bet made him better cricketer know shubman gills career
Kasba Peth Bypoll Election : कसबा बिनविरोध नाहीच! पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये

वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी, शुभमन गिलची अंडर-16 पंजाब क्रिकेट संघात जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली होती. आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये त्याने पाच सामन्यात 330 धावा करून विक्रम केला. 2017 मध्ये, त्याची भारताच्या U-19 क्रिकेट संघासाठी निवड झाली.

19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 2018 साठी उपकर्णधार म्हणूनही त्याची निवड झाली. अलीकडेच वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेदरम्यान शुभमन गिलने मैदानावर वर्चस्व गाजवले.

IND vs NZ 1st odi shubman gill fathers bet made him better cricketer know shubman gills career
IND vs NZ: षटकारची हॅट्ट्रिक अन् शुभमन गिलने झळकावले द्विशतक

शुभमनची बहीण शाहनील गिल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. शुभमन गिलने तरुण वयात टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासोबतच सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा चहाता वर्ग मोठा आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा शुभमन गिल हा सर्वात तरुण खेळाडू आहे. या खेळाडूने वयाच्या 23 वर्षे 132 दिवसांत ही कामगिरी केली. इशान किशनने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते. त्यावेळी किशनचे वय 24 वर्षे 145 दिवस होते. रोहित शर्माने वयाच्या 26 वर्षे 186 दिवसांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक झळकावले.

शुभमन गिल हा न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 1999 साली 186 धावांची इनिंग खेळली होती आणि आता गिल त्याच्या पुढे गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com