IND vs NZ: टीम इंडियाला लागली चिंता! ‘डेथ ओव्हर’ गोलंदाजीचा प्रश्न काय सुटेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 
IND vs NZ 2nd odi Team India

IND vs NZ: टीम इंडियाला लागली चिंता! ‘डेथ ओव्हर’ गोलंदाजीचा प्रश्न काय सुटेना

India vs New Zealand 2st ODI: बांगलादेश, श्रीलंका यांच्याविरुद्धच्या मोहिमा फत्ते केल्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका दुसऱ्या सामन्यातच जिंकण्याची संधी आज भारतीय संघाला मिळणार आहे; परंतु ‘डेथ ओव्हर’मधील गोलंदाजीचा प्रश्न काही सुटलेला नाही.

पहिल्या सामन्यात तब्बल ३५० धावांचे भलेमोठे लक्ष्य दिल्यानंतर न्यूझीलंडची ६ बाद १३१ अशी अवस्था केल्यानंतरही भारतीयांचा श्वास कंठाशी आला होता. या धावसंख्येच्या संरक्षणासाठी अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करण्याची वेळ आली होती.

हेही वाचा: Wrestler Protest : कुस्तीपटूंच आंदोलन म्हणजे दुसरं 'शाहीन बाग', बृजभूषण यांचा पद सोडण्यास नकार

भारतीय गोलंदाजांचे अखेरच्या षटकांमधील अपयश अधूनमधून डोके वर काढतच आहे. जसप्रीत बुमराची उणीव भरून काढणारी कामगिरी महम्मद सिराज करत असला तरी ठोस असे उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी असली तरी भारतीय गोलंदाजीबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही.

विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून सध्याच्या सामन्यांकडे पाहिले जात आहे, असे कर्णधार रोहित शर्मा वारंवार सांगत असला तरी ‘डेथ ओव्हर’मधील अपयश मार्ग काढता आलेला नाही. गोलंदाजांमध्ये अदलाबदल करण्यात येत आहे.

हेही वाचा: Viral Video : जावईबापूला टस्सल, सासरेबुवांचा सिक्सर!; अन्नाच्या बॅटिंगवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

रोहितचे वाढते अपयश...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अखेरचे शतक झाल्यानंतर रोहित शर्माच्या सामन्यांची संख्या वाढत आहे, कधी विराट तर कधी शुभमन गिल यांच्या योगदानामुळे रोहितचे अपयश झाकले जात आहे, परंतु आता त्याच्या अपयशाची चर्चा होऊ लागली आहे. त्याच्याकडूनही मोठी खेळी अपेक्षित आहे.

५० वे वनडे स्टेडियम

उद्याचा हा सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. एकदिवसीय सामना खेळला जाणारे हे भारतातील ५० वे स्टेडियम असणार आहे. याची क्षमता ६० हजारांच्या घरात आहे आणि सर्व तिकिटे विकली गेली असल्याने हाऊसफुल्ल शो असणार आहे.

हेही वाचा: बृजभूषण सिंहांच्या समर्थनार्थ ३ वेळचा महाराष्ट्र केसरी पैलवान आखाड्यात; म्हणाला, हे तर…

संघ यातून निवडणार

भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भारत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, महम्मद शमी, महम्मद सिराज आणि उम्रान मलिक.

न्यूझीलंड ः टॉम लॅथम (कर्णधार), फिन अलेन, डग ब्रेसवेल, मिशेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, डॅरेल मिशेल, हेन्री निकल्स, ग्लेन फिलिप, मिशेल सँटनर, हेन्री शिप्ले, ब्लेअर टिकनर