Ind vs Nz: न्युझीलंडमध्ये पावसाने केलाय कहर तिसऱ्या सामनाही रद्द होणार?

यजमानांनी या निकालासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी कायम राखली आहे.
IND vs NZ 3rd ODI Will rain play spoilsport in Christchurch
IND vs NZ 3rd ODI Will rain play spoilsport in Christchurch esakal
Updated on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (३० नोव्हेंबर) होणार आहे. उभय संघांमधील हा सामना क्राइस्टचर्च येथे होणार आहे. मात्र या सामन्यावर काळ्या ढगांचे सावट पसरले आहे. (IND vs NZ 3rd ODI Will rain play spoilsport in Christchurch )

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७.०० वाजता आणि न्यूझीलंड वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल. पण सामन्याच्या वेळी क्राइस्टचर्चमध्ये 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टी-20 मालिकेतील शेवटचा सामनाही पावसामुळे बरोबरीत सुटला होता, मात्र त्या मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला होता. त्याचबरोबर यावेळी टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे, अशा परिस्थितीत जर हा सामना झाला नाही तर न्यूझीलंड मालिका जिंकेल.

FIFA World Cup 2022 : कॉस्टारिकाच्या विजयाने चुरस वाढली

दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे खेळला गेला. पाऊस आणि खराब हवामानामुळे हा सामनाही रद्द करावा लागला. टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान या सामन्यात पावसामुळे खेळ थांबवावा लागला होता. यानंतर पंचांनी प्रत्येक डावात २९ षटकांचा सामना करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पावसाने पुन्हा एकदा सामन्यात व्यत्यय आणल्याने सामना रद्द करावा लागला.

यजमानांनी या निकालासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी कायम राखली आहे. या पावसाच्या व्यत्ययामुळे भारताच्या ही मालिका जिंकण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com