IND VS NZ : भारतीय क्रिकेटपटूंच्या भोजन मेन्यूवरून वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND VS NZ : भारतीय क्रिकेटपटूंच्या भोजन मेन्यूवरून वाद

IND VS NZ : भारतीय क्रिकेटपटूंच्या भोजन मेन्यूवरून वाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कानपूर : भारत - न्यूझीलंड यांच्यामध्ये गुरुवारपासून येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. यावेळी क्रिकेटच्या मैदानावर युद्ध रंगण्याआधी मैदानाबाहेर वाद निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या भोजन मेन्यूमध्ये हलाल मीटचा (मास) समावेश करण्यात आल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. याप्रसंगी कॅटरिंग व मेन्यूच्या यादीत असे म्हटले गेले आहे की, डुकराचे मास किंवा गोमांस यांचा कुठल्याही अन्नामध्ये समावेश नसावा.

भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता व ॲडव्होकेट गौरव गोयल यांनी याला विरोध केला आहे. यावेळी ते म्हणाले, भारतीय क्रिकेटपटू हवे ते खाऊ शकतात. त्यांच्या भोजन मेन्यूमध्ये फक्त विशिष्ट पदार्थाचा समावेश करणे योग्य नव्हे. हलाल मास आणण्याचा अधिकार बीसीसीआयला कुणी दिला. हे बेकायदेशीर असून आम्ही याला परवानगी देणार नाही. ही शिफारस तातडीने मागे घेण्यात यावी, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाकडून क्रिकेटपटूंचे भोजन मेन्यू ठरवण्यात येतात. पण यासाठी बीसीसीआयच्या परवानगीचीही गरज असते. कारण भारतीय क्रिकेटपटूंच्या भोजन, सुरक्षा व्यवस्थेसह इतर बाबींवर बीसीसीआयचे लक्ष असते. त्यामुळे बीसीसीआयवर सोशल मिडीयावरही टीका करण्यात येत आहे.

न्यूझीलंडच्या खेळाडूंचेही ‘डाएट प्लॅन’

कानपूर कसोटीसाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंसाठीही ‘डाएट प्लॅन’ तयार करण्यात आले आहेत. उपहारादरम्यान न्यूझीलंडचे खेळाडू लाल व पांढरे अशा दोन्ही प्रकारचे मांस खाणार आहेत, तसेच अन्नामध्ये मध्यम प्रमाणात कार्बोहायड्रेट व प्रथिने हवीत. कमी प्रमाणात चरबी आवश्‍यक आहे.

loading image
go to top