IND vs NZ: 'अंपायरचे डोळे फुटले का...' पांड्याच्या वादग्रस्त विकेटवर चाहते संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik pandya out controversy fans trolled umpire

IND vs NZ: 'अंपायरचे डोळे फुटले का...' पांड्याच्या वादग्रस्त विकेटवर चाहते संतापले

Hardik Pandya Wicket Controversy : हैदराबाद एकदिवसीय सामना खराब अंपायरिंगमुळे वादात सापडला आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याला ज्या प्रकारे आऊट करण्यात आले ते पाहून चाहते खूपच निराश झाले आहेत. बॉल आणि विकेटमध्ये खूप अंतर असल्याचं टीव्ही फुटेजवरून स्पष्ट झालं आहे. अशा स्थितीत हार्दिकला कोणत्या आधारावर बाहेर देण्यात आले हे समजण्यापलीकडचे आहे. (Hardik Pandya out Controversy Fans Trolled Umpire)

हेही वाचा: Shubman Gill: 9 षटकार 19 चौकार! फक्त 28 चेंडू अन् 130 धावा; गिलने मोडले अनेक विश्वविक्रम

थर्ड अंपायर केएन अनंत पद्मनाभन यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. 40व्या षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिकला मिचेल सँटनरने बाद केले. चेंडू बॅटच्या अगदी जवळ यष्टीरक्षक टॉम लॅथमच्या ग्लोव्हजमध्ये गेला. थर्ड अंपायरने प्रथम स्निको मीटरने तपासले असता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नसल्याचे आढळून आले. चेंडू बेल्सला लागला नाही तर ग्लोव्हज स्टंपला लागला हे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते. तिसऱ्या पंचाने तरीही हार्दिकला आऊट देण्यात आला.

हेही वाचा: IND vs NZ: षटकारची हॅट्ट्रिक अन् शुभमन गिलने झळकावले द्विशतक

पंचांच्या निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ निराश दिसला. हा पूर्णपणे चुकीचा निर्णय असल्याचे तो म्हणाला. माजी भारतीय क्रिकेट आणि प्रसिद्ध समालोचक महेश मांजरेकर यांनीही पंचांच्या निर्णयावर असहमत व्यक्त केले. तर चाहत्यांनी कमेंट करताना लिहिले की, अंपायरचे डोळे फुटले होते का?.