IND vs NZ : रोहितचे कर्णधारपद जाणार? कोच द्रविडचे धक्कादायक विधान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs New Zealand

IND vs NZ : रोहितचे कर्णधारपद जाणार? कोच द्रविडचे धक्कादायक विधान!

India vs New Zealand : भारतातच सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत न्यूझीलंडच्या संघाला भारतीय संघ धोबीपछाड देत आहे. तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना आज होत असून यात विजय मिळवला आणि निर्भेळ यश मिळवले, तर रोहित शर्माच्या संघाला एकदिवसीय क्रमवारीत अव्वल येण्याची संधी आहे.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या 'वर्कलोड मॅनेजमेंट'शी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे दिली.

हेही वाचा: IND vs NZ: ODIक्रिकेटमध्ये टीम इंडिया होणार 'बादशहा'? तिसऱ्या सामन्यात Playing-11 मध्ये मोठा बदल

दरम्यान, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड वेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगळा कर्णधार असल्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. सर्व प्रश्नांची उत्तरेही त्यांनी अगदी चोखपणे दिली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी अशाच प्रश्नावर द्रविड म्हणाला, 'मला याची माहिती नाही. तुम्ही हा प्रश्न निवडकर्त्यांना विचारला पाहिजे पण सध्या मला तसे वाटत नाही.

हेही वाचा: Pakistan Chief Selector: कोण आहे हारून राशिद ज्याने बूम बूम आफ्रिदीला खुर्चीवरून खाली खेचले?

कोहली, रोहित सारख्या वरिष्ठ खेळाडूंसाठी वर्कलोड मॅनेजमेंट : राहुल द्रविड

राहुल द्रविड म्हणाला, “आम्ही या गोष्टींचा आढावा घेत आहे. T20 मालिकेत आम्ही आमच्या काही खेळाडूंना (रोहित, विराट, केएल राहुल) ब्रेक दिला आहे त्याला तुम्ही वर्कलोड मॅनेजमेंट म्हणू शकता. दुखापती व्यवस्थापन आणि वर्कलोड मॅनेजमेंट या दोन भिन्न गोष्टी आहेत, आम्ही किती क्रिकेट खेळतो आणि आमच्याकडे आमचे मोठे खेळाडू उपलब्ध आहेत याची खात्री करून आमचे प्राधान्य काय आहे यावर आधारित आम्हाला संतुलित करावे लागेल."

हेही वाचा: Smriti Mandhana: 11 चेंडूत 46 धावा! स्मृतीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, श्रीकर भरत, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, उमरान मलिक.