IND vs NZ : 'संघात समतोल बिघडला पण...' उपकर्णधार पांड्याच्या जागी कोण खेळणार? कोच राहुल द्रविड स्पष्टच बोलले

rahul dravid gives hint shardul thakur will play hardik pandya
rahul dravid gives hint shardul thakur will play hardik pandya

India vs New Zealand World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात यशस्वी संघांमध्ये आज सामना होणार आहे. भारतीय संघ आज धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघ सध्या विजयी मार्गावर असून सलग चार सामने जिंकले आहेत. पण टीम इंडिया 20 वर्षांपासून वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जिंकू शकलेली नाही.

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याशिवाय भारतीय संघ आज न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे संघ अडचणीत सापडला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. हार्दिकच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असेल या प्रश्नाचे उत्तर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले.

rahul dravid gives hint shardul thakur will play hardik pandya
IND vs NZ Playing 11: शमी-सूर्याला संधी मिळणार की शार्दुल खेळणार? टीम इंडियासमोर आज न्यूझीलंड, कोण बनणार नंबर 1?

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्डकप सामन्यापूर्वी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. अष्टपैलू खेळाडूबाबत तो म्हणाला, हार्दिक पांड्या आमच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या अष्टपैलू खेळामुळे संघात समतोल होतो. तो न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नाही, आता प्लेइंग इलेव्हनमध्ये संतुलन कसे आणायचे ते पाहावे लागेल. त्याच्या जागी कोणत्या खेळाडूचा समावेश करायचा हे आम्ही परिस्थितीनुसार सामन्यापूर्वी ठरवू.

हार्दिकबद्दल बोलत असताना प्रशिक्षक द्रविडने शार्दुल ठाकूरशी चर्चा केली आणि म्हणाला, बघा शार्दुल ठाकूर संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो की नाही याबद्दल मला जास्त खोलात जायला आवडणार नाही. त्याच्याकडे विकेट घेण्याची कला आहे. पण त्याला आतापर्यंत फलंदाजीची संधी मिळाली नाही. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीनंतर संघ संयोजनाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आम्हाला तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसोबत जायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com