रोहितच्या कॅप्टनसीत विक्रमी सलामी, जे कुणाल जमलं नाही ते टीम इंडियन करून दाखवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजय; भारताच्या नावावर खास विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी न्यूझीलंडला पहिल्या टी २० सामन्यात पाच विकेटने पराभूत केले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजय; भारताच्या नावावर खास विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी न्यूझीलंडला पहिल्या टी २० सामन्यात पाच विकेटने पराभूत केले. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या विजयात रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह टी २० क्रिकेटमध्ये भारताने धावांचा पाठलाग करताना ५० व्या विजयाची नोंद केली. असं करणारा भारतीय क्रिकेट संघ पहिलाच ठरला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग करताना समान विजय मिळवले होते. तिन्ही संघांचे टी २० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ४९ विजय झाले होते. न्यूझीलंडला पराभूत करून भारताने ५० व्या विजयाची नोंद करत इतिहास रचला आहे.

टी २० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतानंतर आता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ४२ विजयासह इंग्लंड आहे. तर ३५ विजयांसह आफ्रिका चौथ्या आणि ३२ विजयांसह न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: IND vs NZ : जखमी वाघ! सिराजनं हाताला पट्टी बांधून टाकली बॉलिंग

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने दव पडण्याच्या शक्यतेमुळे नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. टी२० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या मिशेलला भोपळाही न फोडता भुवनेश्वरने तंबूत धाडले. त्यानंतर मार्टिन गुप्टिल आणि मार्क चॅपमॅन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने १६४ धावांचे आव्हान भारताला दिले.

न्यूझीलंडने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या डावाची सूत्रे रोहित आणि सूर्यकुमार यादवने हातात घेतली. त्यांच्या खेळीच्या जोरावर भारताने पाच गडी राखून सामना जिंकला. श्रेयस अय्यर आणि पदार्पण करणाऱ्या व्यंकटेश अय्यर यांना फारशी चमक दाखवता आली नाही.

loading image
go to top