IND vs NZ Test : वानखेडे स्टेडियवर 100 टक्के एन्ट्री; राज्य सरकारनं दिली परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ Test  Wankhede Stadium
IND vs NZ Test : वानखेडे स्टेडियवर 100 टक्के एन्ट्री; राज्य सरकारनं दिली परवानगी

IND vs NZ Test : वानखेडे स्टेडियवर 100 टक्के एन्ट्री; राज्य सरकारनं दिली परवानगी

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबई कसोटीसाठी वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांची 100 टक्के उपस्थिती राहणार आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA ) स्टेडियमच्या क्षमतेनुसार 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यासंदर्भात परवानगी दिली आहे. 3 डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नियोजित सामन्यासाठी प्रेक्षक क्षमतेच्या 100 टक्के लोकांना प्रवेश देण्यास काहीच हरकत नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. याशिवाय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सराव शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलीये. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, वृद्धिमान साहा आणि उमेश यादव या शिबिरात सहभागी होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नियोजित असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळावा, अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र राज्य सरकारला पत्राच्या माध्यमातून केली होती. राज्य सरकारने यासाठी परवानगी दिली आहे.

हेही वाचा: NZ vs AUS Final: सुनील गावसकर म्हणतात, "हाच संघ जिंकणार"

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. 17 नोव्हेबरला जयपूरच्या मैदानातून न्यूझीलंडचा संघ टी20 सामन्याने भारत दौऱ्याला सुरुवात करेल. 19 नोव्हेबरला दुसरा टी-20 सामना रांचीच्या मैदानात खेळवण्यात येणार असून तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना कोलकाताच्या मैदानात रंगणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर 25 ते 29 नोव्हेंबर रोजी कानपूरच्या मैदानात पहिला कसोटी सामना नियोजित आहे. त्यानंतर अखेरचा कसोटी सामना 3 ते 7 डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात येईल.

loading image
go to top