Team India Test Squad Announced | विराटसह रोहितही संघाबाहेर; भारताचा टेस्ट संघ जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

भारत न्यूझीलंड विरोधात खेळणार २ कसोटी सामने

IND vs NZ: विराटसह रोहितही संघाबाहेर; भारताचा टेस्ट संघ जाहीर

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ Test Series : न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची BCCI ने आज घोषणा केली. या संघात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, पहिल्या सामन्यासाठी विराटदेखील संघाबाहेरच असणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे भारताची धुरा असणार आहे. तर, रोहित शर्मा नसल्याने उपकर्णधार पदाची जबाबदारी चेतेश्वर पुजाराकडे सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या कसोटीत मात्र विराट कोहली संघात परतणार आहे.

टीम इंडियाचा संघ-

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

loading image
go to top